Central Railway Special Trains : होळीनिमित्त मुंबई आणि पुण्यावरून नागपूर च्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वे विभागाने मुंबई आणि पुण्यावरून नागपूर साठी दरम्यान तब्बल आठ स्पेशल गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन ऑन डिमांड’ (टीओडी) योजनेअंतर्गत या रेल्वे चालवण्यात येतील. विदर्भातून मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात नोकरी आणि शिक्षणानिमित्त येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. अशा प्रवाशांना या विशेष रेल्वेचा होळीच्या सणासाठी मोठा फायदा होईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई-नागपूर दरम्यान गाडी क्रमांक ०२१४१/०२१४२ या साप्ताहिक विशेष गाड्या २२ आणि २४ फेब्रुवारी रोजी प्रत्येकी दोन फेऱ्या करतील. मुंबईहून ही रेल्वेगाडी ००.२० वाजता सुटून दुपारी १५.१० वाजता नागपूरला पोहोचेल. तर, नागपूरहून सायंकाळी २०.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १३.३० वाजता मुंबईत पोहचेल. प्रवासा दरम्यान ही ट्रेन दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेर, धामनगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबेल. या रेल्वेच्या रचनेबाबत सांगायचं झाल्यास या ट्रेनमध्ये १ एसी द्वितीय श्रेणी, ६ एसी तृतीय श्रेणी, ९ स्लीपर, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणीचा समावेश आहे. Central Railway Special Trains
दुसरीकडे, गाडी क्रमांक ०१४६९ साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी दिनांक २४ फेब्रुवारी व ०३ मार्च रोजी पुणे येथून दर मंगळवारी १५.५० वाजता सुटेल व नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक ०१४७० साप्ताहिक विशेष दिनांक २५.फेब्रुवारी व ०४ मार्च रोजी नागपूर येथून दर बुधवारी ०८.०० वाजता सुटेल. ही रेल्वे त्याच दिवशी २३.३० वाजता पुणे येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या रेल्वे स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत. मुंबई -पुण्याहून नागपूरला धावणाऱ्या या विशिष्ट ट्रेनमुळे प्रवाशांना मोठा फायदा होईल आणि गर्दी पासून त्यांची नक्कीच सुटका होण्यास मदत होईल.