Central Railway Special Trains From Mumbai : मुंबईतून धावणार 24 स्पेशल रेल्वे!! नागपूर, पुणे, कोकणाला फायदा;वेळापत्रक पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Central Railway Special Trains From Mumbai । मुंबईतून पश्चिम महाराष्ट, नागपूर आणि कोकणात रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने वाढत्या प्रवाशांच्या मागणीला पूर्ण करण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूर, कोल्हापूर आणि सावंतवाडी रोडसह इतर प्रमुख ठिकाणांदरम्यान २४ विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली. त्यानुसार, मध्य रेल्वे सीएसएमटी आणि कोल्हापूर दरम्यान सहा विशेष गाड्या, सीएसएमटी आणि सावंतवाडी रोड दरम्यान सहा सेवा, दोन सीएसएमटी-नागपूर सुपरफास्ट विशेष गाड्या, चार एलटीटी-नागपूर सेवा आणि सहा पुणे-नागपूर सुपरफास्ट विशेष गाड्या चालवेल.या गाड्या दादर, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, जळगाव, अकोला, वर्धा, सातारा, सांगली, मिरज, रत्नागिरी आणि कोकण रेल्वेच्या अनेक प्रमुख स्थानकांवर थांबतील.या विशेष गाड्यांमध्ये विविध श्रेणीतील प्रवाशांसाठी एसी २-टायर, एसी ३-टायर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास डबे असतील.

सीएसएमटी-कोल्हापूर-सीएसएमटी स्पेशल ट्रेन (६ सेवा)

  • ट्रेन क्रमांक ०१०२९ हि १३ आणि २० फेब्रुवारी रोजी दुपारी ०२.३० वाजता सीएसएमटीहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.२० वाजता कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
  • ट्रेन क्रमांक ०१०३० ही विशेष गाडी १४, १९ आणि २१ फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून दुपारी ०३:५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.

सीएसएमटी-सावंतवाडी रोड -सीएसएमटी विशेष ट्रेन –

  • ट्रेन क्रमांक ०११२९ ही विशेष रेल्वेगाडी १४, १९ आणि २१ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२:२० वाजता सीएसएमटी येथून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी १२:३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
  • ट्रेन क्रमांक ०११३० ही विशेष गाडी १४, १९ आणि २१ रोजी दुपारी ०५:२० वाजता सावंतवाडी रोड येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.

सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी सुपरफास्ट विशेष ट्रेन –

  • ट्रेन क्रमांक ०२१३९ सुपरफास्ट स्पेशल १९ फेब्रुवारी रोजी सीएसएमटीहून सकाळी १२:२० वाजता निघेल आणि त्याच दिवशी दुपारी ०३:३० वाजता नागपूरला पोहोचेल.
  • ट्रेन क्रमांक ०२१४० सुपरफास्ट स्पेशल १७ फेब्रुवारी रोजी नागपूरहून रात्री ०८:०० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ०१:३० वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

एलटीटी-नागपूर-एलटीटी स्पेशल ट्रेन

  • ट्रेन क्रमांक ०१०२१ सुपरफास्ट स्पेशल: १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनल (एलटीटी) येथून मध्यरात्री १२:५५ वाजता निघेल आणि त्याच दिवशी दुपारी ०३:४५ वाजता नागपूरला पोहोचेल.
  • ट्रेन क्रमांक ०१०२२ ही स्पेशल १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी नागपूरहून रात्री ०८:०० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता एलटीटीला पोहोचेल.

पुणे-नागपूर-पुणे सुपरफास्ट स्पेशल

  • ट्रेन क्रमांक ०१४६७ १३ आणि २० फेब्रुवारी रोजी दुपारी ०३:५० वाजता पुण्याहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:३० वाजता नागपूरला पोहोचेल.
  • ट्रेन क्रमांक ०१४६८ १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ०८:०० वाजता नागपूरहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री ११:३० वाजता पुण्यात पोहोचेल.
  • ट्रेन क्रमांक ०१४१९ १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ०३:५० वाजता पुण्याहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:३० वाजता नागपूरला पोहोचेल.
  • ट्रेन क्रमांक ०१४२० १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ०८:०० वाजता नागपूरहून निघेल आणि त्याच दिवशी सकाळी ११:३० वाजता पुण्यात पोहोचेल.
    पुणे-नागपूर-पुणे सुपरफास्ट गाड्या उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबतील.

बहुतेक विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) काउंटरवर आणि IRCTC वेबसाइटवर खुले आहे. तर अनारक्षित कोचची तिकिटे UTS प्रणालीद्वारे बुक करता येतात, तर प्रवासी तिकिट बुकिंगसाठी RailOne अॅप देखील वापरू शकतात.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading