Karad Chiplun Road : कराड – चिपळूण महामार्ग वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Karad Chiplun Road । पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येतेय. कराड ते चिपळूण महामार्गावरील वाहतुकीत 27 मार्च ते 27 मे दरम्यान बदल करण्यात आला आहे. पाटण शहरातील धांडे पुलाची पुनर्बांधणी व बाजारपेठेतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल 60 दिवसांसाठी या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, पाटण पोलीस ठाणे हद्दीतुन जाणारा कराड ते चिपळुण (Karad Chiplun Road) राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ई या महामार्गावर पाटण शहरातील धांडे पुलाची पुर्नबांधणी आणि बाजारपेठेतील क्रॉक्रीट रस्त्याचे काम करण्याचे असल्याने सदर मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करुन पुलाची पुर्नबांधणी आणि बाजारपेठेतील क्रॉक्रीट रस्त्याचे काम पुर्ण करणेकरीता ६० दिवस कालावधी लागणार आहे. तोपर्यत नागरीकांची तसेच वाहनचालकांची गैरसोय होवु नये याकरीता सदर मार्गावरील वाहतूकीचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्या करीता पर्यायी मार्गाचा अवलंब करावा

वाहतुक मार्गातील बदल खालीलप्रमाणे करण्यात आला आहे.

१. कराड व उंब्रज बाजुकडुन चिपळुणकडे जाणारी अवजड वाहतुक :- कराड व उंब्रज येथून सरळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ०४ वरुन पाचवंड फाटा – उंडाळे – कोकरुड – मलकापुर – आंबा घाट संगमेश्वर वरुन चिपळुन कडे जाईल. Karad Chiplun Road

२. चिपळुन कडुन कराड व उंब्रज कडे येणारी अवजड वाहतुक : चिपळुन वरुन संगमेश्वर आंबा घाट मलकापुर कोकरुड उंडाळे पाचवड फाटा राष्ट्रीय महामार्ग क्र. ०४ वरुन कराड, उंब्रज कडे जाईल.

३. कराड व उंब्रज बाजुकडुन चिपळुण कडे जाणारी सर्व हलकी वाहतुक :- कराड व उंब्रज येथुन नवारस्ता गव्हाणवाडी फाटा नेरळे गौंड येथुन कराड ते चिपळुन महार्गावरुन चिपळुन कडे जातील.

४. चिपळूण बाजुकडुन कराड उंब्रज कडे येणारी सर्व हलकी वाहतुक :- चिपळुन कडुन येणारी वाहतुक नेरळे गौंड गव्हाणवाडी फाटा नंवारस्ता मार्गे कराड व उंब्रज कडे जातील.

तरी वरील वाहतूक ज्या ज्या ठिकाणावरुन वळविण्यात आली आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वरील वाहतूक मार्गात केलेल्या बदलांबाबत सर्व नागरीकांनी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading