MHADA Lottery 2026 : म्हाडाची 3000 घरांसाठी लॉटरी!! पुणेकरांसाठी धमाकेदार ऑफर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MHADA Lottery 2026 । पुण्यात स्वतःचे असं हक्काचे घर घेणाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) घोषणा केली की ते मार्चमध्ये 3000 परवडणाऱ्या घरांसाठी अतिरिक्त लॉटरी काढणार आहे. खरं तर यापूर्वी म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी म्हाडाच्या 4,186 घरांची सोडत काढण्यात आली होती. या घरांसाठी तब्बल 2 लाख 15 हजार 965 अर्ज प्राप्त झाले होते. आता आणखी ३००० घरांची लॉटरी निघणार असल्याने नवीन घर घेणाऱ्यांना हि मोठी सुवर्णसंधी म्हणावी लागेल.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे (म्हाडा) सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या मार्च महिन्यातील आगामी सोडतीसोबतच विविध ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यानुसार, शिरूर येथे 574 घरांचे आणि खराबवाडी येथे 194 व्यापारी गाळ्यांचे काम वेगाने सुरू आहे. ताथवडे येथील पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यातील सुद्धा सुमारे 80 टक्के काम झाले आहे. लवकरच येथे 750 निवासी आणि अनिवासी गाळे सोडतीसाठी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय म्हाळुंगे, सोलापूर, बारामती आणि पुरंदर येथेही नवीन घरांचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा फायदा होईल. म्हाडाच्या मते, पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने गेल्या अडीच वर्षांत सुमारे 25000 परवडणाऱ्या घरांची विक्री उपलब्ध करून दिली आहे.
दरम्यान, खासगी डेव्हलपर्स कडून २० टक्के योजनेतील घरांसाठी जास्तीचे पैसे मागितल्याच्या तक्रारींची सुद्धा म्हाडाने गंभीर दखल घेतली आहे. अशा अनेक प्रकरणांत मध्यस्थी करून वाढीव शुल्क रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, विजेत्यांना ५० टक्के पार्किंग मिळणे अनिवार्य असल्याचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलं










