हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mhada Mumbai Lottery 2026 । जर तुम्ही मुंबईसारख्या मायानगरीत स्वस्तात मस्त घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर हि बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आणि संधीच सोन करून देणारी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) लवकरच आपली वार्षिक लॉटरी गृहनिर्माण योजना जाहीर करणार आहे. याअंतर्गत मुंबईत तब्बल २५०० घरांचे वाटप केलं जाणार आहे. हि घरे नेहमीप्रमाणे कमी पैशात उपलब्ध असल्याने खरेदीदारांना मोठी संधी आहे.
या लॉटरी योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व उत्पन्न गटातील लोक अर्ज करू शकतात. EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक), LIG (कमी उत्पन्न गट), MIG (मध्यम उत्पन्न गट) आणि HIG (उच्च उत्पन्न गट) अर्ज करू शकतात. जनसंपर्क अधिकारी (PRO) लवकरच या लॉटरी संदर्भात एक जाहिरात प्रसिद्ध करतील. ही लॉटरी योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक, कमी उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटांना आकर्षित करेल. ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाखांपर्यंत आहे त्यांचा समावेश दुर्बळ घटकांमध्ये होईल, ज्या लोकांचं वार्षिक उत्पन्न ६ ते ९ लाख पर्यंत आहे त्यांचा समावेश मध्यम उत्पन्न गटामध्ये होईल. तर उच्च उत्पन्न गटामध्ये ९ ते १२ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्यांचा समावेश आहे. Mhada Mumbai Lottery 2026
कोणकोणत्या भागात घरे उपलब्ध असतील?
या योजनेअंतर्गत फ्लॅट्स मुंबईतील अंधेरी, गोरेगाव, ताडदेव, लोअर परेल, जुहू, विक्रोळी आणि पवई यांसारख्या अनेक प्रमुख भागांमध्ये असतील. या भागांमध्ये प्रमुख आणि विकसनशील अशा दोन्ही भागांचा समावेश आहे. खरेदीदार त्यांच्या गरजेनुसार ठिकाण निवडू शकतात. मुंबई शहर हे भारताची आर्थिक राजधानी आहे, मुंबईत सध्याच्या महागाईच्या काळात घर खरेदी करणं नक्कीच सोप्प काम नाही. सर्वसामान्य माणसाच्या तर ती आवाक्याच्या बाहेरील गोष्ट आहे. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना घर घेणे अवघड जाते. त्यामुळे, स्वप्नांच्या शहरात स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाची हि लॉटरी फायदेशीर ठरू शकते. Mhada Mumbai Lottery 2026
म्हाडा कडून या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा करण्याकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा आपल्या मोबाईलमध्ये MHADA Lottery हे ॲप डाऊनलोड करा.