हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसारख्या मायानगरीत आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) मुंबईतील ११८ फ्लॅट्सची ऑनलाइन विक्री सुरू केली आहे. आजपासून म्हणजे १७ फेब्रुवारी २०२६ पासून यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर हि लॉटरी जाहीर झाली आहे. म्हाडाच्या मते, हे फ्लॅट्स यापूर्वी सुद्धा विक्रीस निघाले होते, मात्र कोणत्या ना कोणत्या कारणानी या ११८ फ्लॅटची विक्री झाली नव्हती.
कोणकोणत्या भागात मिळणार घरे ?
हे ११८ फ्लॅट कांदिवली, चारकोप, शिंपोली, अँटॉप हिल, वडाळा, पवई, मालाड, मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी, भायखळा, तारदेव, लोअर परेल, सायन, जुहू आणि अंधेरी सारख्या मुंबईच्या महत्वाच्या भागात मिळतील. 118 घरांपैकी 82 घरे म्हाडाच्या स्वतःच्या वसाहतींमध्ये आहेत. यात कांदिवली शिंपोलीत 8, चांदकोप सेक्टर-8 मध्ये 1, वडाळा अंटोप हिलमध्ये 27, पवई तुंगात 42, मालाड मालवणी आणि गायकवाड नगरमध्ये प्रत्येकी 1 घरे आहेत. बाकीची 36 घरे विकास नियंत्रण नियम 33(5)(7)58 अंतर्गत मिळणार आहेत. यामध्ये मग घाटकोपर 2, विक्रोळी कन्नमवार नगरात 1, वडाळ्यात 8, भायखळ्यात 6, ताडदेवमध्ये 6, लोअर परळमध्ये 8, सायनमध्ये २ आणि अंधेरी पश्चिम जेव्हीपीडीत 7 फ्लॅट्स आहेत. एकूणच काय तर मुंबईच्या अतिशय महत्वाच्या भागातच ही सर्व घरे मिळणार आहेत. Mumbai MHADA Lottery 2026
किंमत किती असेल ? Mumbai MHADA Lottery 2026
आता राहिला प्रश्न तो म्हणजे या घराच्या किमती किती असतील? तर म्हाडा अंतर्गत मिळणाऱ्या या ११८ फ्लॅट्सच्या किमती त्याच्या श्रेणीनुसार निश्चितच वेगवेगळ्या असणार आहेत. यातील सर्वात कमी किमतीच्या फ्लॅटची किंमत ३८ लाख रुपये आहे तर सर्वात महागड्या फ्लॅटची किंमत ८ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
पात्रता आणि कागदपत्रे
अर्जदार १८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे भारतीय नागरिक असले पाहिजेत.
महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र जानेवारी २०१८ नंतर जारी केले पाहिजे.
आधार आणि पॅनकार्ड सारखी कागदपत्रे आवश्यक आहेत, ज्यात जोडीदाराची माहिती असावी.
कर्ज घेऊन ही खरेदी करण्याची योजना आखणाऱ्या घर खरेदीदारांना वित्तीय संस्थांकडून पूर्व-मंजूर पत्रे मिळणे आवश्यक आहे, त्यानंतर बँकेच्या नावाने एनओसी जारी केली जाईल.
अर्ज कधी करावा ?
सर्व प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. प्रथम वेबसाइटवर नोंदणी करा. अर्ज सादर करणे, सुरक्षा ठेवी आणि अर्ज शुल्क भरणे आणि फ्लॅट निवडण्याची प्रक्रिया औपचारिकपणे ४ मार्च २०२६ पासून सुरू होईल. फ्लॅट अंतिम झाल्यानंतर, खरेदीदारांनीना ४८ तासांच्या आत विक्री किमतीच्या १० टक्के रक्कम भरावी लागेल. ही रक्कम न भरल्यास तुमचा दावा रद्द होईल आणि अनामत पैसे सुद्धा परत मिळणार नाहीत. एकदा 10 टक्के रक्कम भरली कि मग 90 दिवसांत बाकीची रक्कम भरावी लागेल.