हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Nashik Local Train । मुंबईच्या लोकल रेल्वेसेवेचा विस्तार आता थेट नाशिक पर्यंत होणार आहे. आगामी काळात मुंबई ते नाशिक अशी लोकल सेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी एका कार्यक्रमात याबाबत माहिती दिली. या नव्या रेल्वेमार्गामुळे मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होईल. मुंबई आणि नाशिक हि दोन्हीही औद्योगिक शहरे असल्याने प्रवाशांना या नवीन लोकल ट्रेनचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
18 बोगदे उभारण्यात येणार – Mumbai Nashik Local Train
सध्या मध्य रेल्वेची लोकल सेवा ही कसरापर्यंत असून ती लवकरच नाशिकपर्यंत करण्यात येणार आहे. कसारा – मनमाड दरम्यान तिसर्या आणि चौथ्या रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. यामुळे आता मुंबई आणि नाशिकमधील अंतर आणि वेळ कमी होणार आहे. तसेच प्रवाशांना नॉनस्टॉप प्रवास करता येणार आहे. मुंबई ते नाशिक हा डोंगर रांगांचा हा भाग आहे. याठिकाणी नव्या रेल्वे लाइनसाठी जवळपास 18 बोगदे बांधावे लागतील. परंतु या नव्या रेल्वे लाइन्समुळे सह्याद्रीच्या रांगेत रेल्वे वाहतूक अजून वेगवान आणि सोप्पी होण्यास मदत होणार आहे. Mumbai Nashik Local Train
मुंबई ते नाशिक रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरु झाली असून नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मध्य रेल्वेचा मानस आहे. सध्या लोकल सेवा ही कसारापर्यंत असून . कल्याण ते नाशिक रोड दरम्यान कसारा, इगतपुरी, देवळाली ही प्रमुख स्थानकं असणार आहे. त्यामुळे त्याठिकाणच्या प्रवाशांना सुद्धा या नवीन लोकल ट्रेनचा फायदा होईल.
मुंबई ते नाशिक लोकल ट्रेनमुळे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई दरम्यानची कनेक्टिव्हिटी मजबूत होणार आहे. तसेच दोन्ही शहरातील औद्योगिक विकासालाही बळ मिळताना दिसेल. प्रवाशांना कमी वेळेत आरामदायी प्रवास करता येईल. खरं तर मुंबई ते नाशिक अशी थेट लोकलसेवा चालवण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून अनेक वर्षांपासून सुरु आहे. या मागणीला आता यश मिळताना दिसत आहे. लवकरच प्रवाशांचे हे स्वप्न सत्यात उतरेल.