Mumbai Vijaydurg Ro-Ro Ferry : मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी; पहा कसे असेल वेळापत्रक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Vijaydurg Ro-Ro Ferry । शिमग्याच्या सणाला मूळगावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी वाढती गर्दी लक्षात घेता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोकोनवासीयांना शिमग्यासाठी आता बोटीने जाता येणार आहे. १ मार्च २०२६ पासून मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा सुरु होणार आहे. या नवीन वाहतूक सुविधेमुळे मुंबई ते विजयदुर्ग अंतर अवघ्या ७ तासांत पार करता येणार आहे. मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवेमुळे सागरी पर्यटनाला नवी दिशा आणि चालना मिळणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवेच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे स्वतः प्रवास करून या सुविधेचे उद्घाटन करणार आहेत.

कसे असेल वेळापत्रक? Mumbai Vijaydurg Ro-Ro Ferry

१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मुंबई बंदरातून पहिली बोट विजयदुर्गसाठी रवाना होईल आणि दुपारी ३ वाजता ती विजयदुर्ग पोहोचेल. परतीच्या प्रवासात हीच बोट २ मार्च रोजी दुपारी १२ वाजता विजयदुर्गहून निघेल आणि संध्याकाळी ७ वाजता मुंबईत दाखल होईल. मार्च महिन्यात मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवेच्या तब्बल १६ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार, मुंबई बंदरातून ४, ७, ११, १४, १८, २१, २५ मार्च रोजी या बोटी विजयदुर्गच्या दिशेने जातील. तर ५, ८, १२, १५, १९, २२ आणि २६ मार्च रोजी याच बोटी परतीच्या प्रवासात मुंबईकडे रवाना होतील. Mumbai Vijaydurg Ro-Ro Ferry

मुंबई-विजयदुर्ग रो-रोचे तिकिट किती ?

मुंबई- विजयदुर्ग प्रस्तावित तिकिट दर खालीलप्रमाणे असतील,

इकॉनॉमी : 2,500 रुपये
प्रिमीयम इकॉनॉमी : 4,000 रुपये
दुचाकी वाहन : 1,000 रुपये
सायकल : 600 रुपये
चारचाकी : 6,000 रुपये

या सेवेमुळे प्रवाशांना आरामदायी आणि निसर्गरम्य प्रवासाचा अनुभव घेता येईल. परंतु मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवेला प्रवाशांचा किती प्रतिसाद मिळतो ते पहायला हवं, जर प्रवाशांनी मोठ्या संख्येने रो रो प्रवास केला तर कोकणातील पर्यटन क्षेत्राला मोठी मिळेल. तसेच, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होण्याची शक्यता आहे. स्थानिक व्यापारालाही नवी उभारी मिळेल. एकीकडे मुंबईहुन कोकणात रस्ते मार्गाने जायचं म्हंटल तर खराब रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागत, तर दुसरीकडे रेल्वेने जायचं म्हंटल तर तरीही रेल्वेला प्रवाशांची मोठी गर्दी बघायला मिळते. अशावेळी समुद्रातून प्रवासाचा नवा अनुभव देणारी रो रो सेवा कोकणवासीयांसाठी अतिशय उत्तम सुविधा ठरणार आहे. यामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीला नवा पर्याय मिळणार आहे.

Leave a Comment

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading