Navi Mumbai Mahape Fire News : नवी मुंबईतील केमिकल कंपनीला आग!! सर्वत्र धुराचे लोट, Video व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Navi Mumbai Mahape Fire News । नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. नवी मुंबईतील महापे एमआयडीसी औद्योगिक परिसरातील एका केमिकल कंपनीला आग लागली. आग हि प्रचंड मोठी असून सर्वत्र धुराचे साम्राज्य बघायला मिळतेय. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पाहायला मिळतेय. या आगीचे व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखे व्हायरल झाले ज्यामध्ये तुम्हीही या भीषण आगीचे भयावह दृश्य पाहू शकता.

आगीचे नेमके कारण ?

महापे एमआयडीसी परिसरातील ‘बिटाकेम केमिकल नावाच्या कंपनीत हि आग लागली. आगीचे स्वरूप इतके रौद्र आहे की, संपूर्ण परिसरात धुराचे काळे लोट पसरले असून लांबूनच आगीच्या ज्वाला दिसत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार, ही आग कारखान्याच्या आवारात शॉर्ट सर्किट किंवा रासायनिक अभिक्रियेमुळे लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग पूर्णपणे विझल्यानंतर आणि सखोल चौकशी केल्यावरच नेमके कारण स्पष्ट होईल. Navi Mumbai Mahape Fire News

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल –

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम करत आहेत, तसेच आग जवळच्या औद्योगिक युनिट्समध्ये पसरू नये यासाठीही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दाट धुरामुळे स्थानिक कामगार आणि रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही, हाच एकमेव दिलासा म्हणता येईल. सध्या आग विझवण्याचे आणि कुलिंगचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading