बाब्बो!! वाहतूक कोंडीत पुण्याचा जगात 5 वा क्रमांक; धक्कादायक अहवाल समोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल अनेक मोठमोठ्या शहरात वाहतूक कोंडी हेच सर्वात मोठं संकट बनले आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या आणि गाड्या यांच्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचे संकट गडद होत चाललं आहे. परिणामी प्रवाशांचा महत्वाचा वेळ रस्त्यावरच जाताना दिसतोय. आपल्या भारतात तर वाहतूक कोंडीचे प्रमाण जास्त असून टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या नव्या रँकिंगमध्ये जगातील पहिल्या १० शहरात भारतातील २ शहरांचा समावेश झालाय. यातील एक शहर तुमच्या आमच्या महाराष्ट्रातील आहे. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या अहवालात फक्त वाहतुकीची टक्केवारीच नाही तर वाहनांचा सरासरी वेग, १५ मिनिटांत प्रवास केलेले सरासरी अंतर आणि वर्षभरातील वाहतूक कोंडीमुळे वाया गेलेला वेळ यांचीही माहिती दिली आहे.

१. मेक्सिको सिटी (मेक्सिको)

या यादीत मेक्सिको सिटी हे पहिल्या क्रमांकावर आहे. येथील सरासरी वेग सुमारे १७ किमी/तास आहे. येथील लोक १५ मिनिटांत फक्त ४.४ किलोमीटर प्रवास गाडीतून करतात. याव्यतिरिक्त, गर्दीमुळे लोक दरवर्षी १८४ तास वाया घालवतात.

२. बेंगळुरू (भारत)

जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या यादीत भारतातील बेंगळुरू शहराचा दुसरा क्रमांक लागतो. येथील सरासरी वेग ताशी १६.६ किमी आहे. आणि प्रवासी १५ मिनिटांत फक्त ४.२ किमी प्रवास करू शकतात. दरवर्षी तब्बल १६८ तास वाहतूक कोंडीतच वाया जाता दिसताना .

३. डब्लिन (आयर्लंड)

डब्लिनमधील प्रवाशांचा सरासरी वेग ताशी १७.४ किमी आहे. प्रवासादरम्यान तब्बल १९१ तास वाहतूक कोंडीतच नागरिकांना अडकावे लागते हि येथील मुख्य समस्या आहे.

४. लोड्ज (पोलंड)

पोलंडमधील लोड्ज या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. येथील लोकांचा सरासरी वेग २२.५ किमी/ताशी आहे. प्रवाशी १५ मिनिटांत फक्त ५.६ किमी प्रवास करू शकतात. या वाहतुकीमुळे दरवर्षी १३५ तास वाया जातात.

५. पुणे (भारत)

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे जागतिक वाहतूक कोंडीत ५ व्या क्रमांकावर आहे. येथील लोक वाहतुकीमुळे दरवर्षी १५२ तास वाया घालवतात. त्याच वेळी, वाहनांचा सरासरी वेग १८ किमी/तास आहे आणि ४.५ किमी अंतर पार करण्यासाठी तब्बल १५ मिनिटे खर्च करावे लागतात.

६. लुब्लिन (पोलंड)

या यादीत वेगाच्या बाबतीत हे शहर लक्षणीयरीत्या वरचे स्थान मिळवते. १५ मिनिटांत ६.८ किमी अंतर पार करता येते. येथील लोक वाहतुकीमुळे दरवर्षी ११७ तास वाया घालवतात. वाहनांचा सरासरी वेग फक्त २७ किमी/तास आहे.

७. बोगोटा (कोलंबिया)

बोगोटा येथील डेटा दर्शवितो की दररोजच्या प्रवासात वाहतूक महत्त्वाची भूमिका बजावते आणि गर्दीच्या वेळी परिस्थिती आणखी बिकट होते. येथील सरासरी वाहन वेग १८.९ किमी/तास आहे. लोक १५ मिनिटांत फक्त ४.७ किमी प्रवास करू शकतात, ज्यामुळे दरवर्षी १५३ तास ​​वाया जातात.

८) अरेक्विपा (पेरू)

अरेक्विपा येथील लोक दरवर्षी वाहतुकीमुळे १५४ तास वाया घालवतात. येथील वाहनांचा सरासरी वेग १८ किमी/तास आहे. आणि लोक १५ मिनिटांत फक्त ४.५ किमी प्रवास करू शकतात.

९. लिमा (पेरू)

या टॉप १० मध्ये लिमाचा वाहतूक डेटा सर्वात धक्कादायक आहे, कारण केवळ गर्दीच्या वेळेत दरवर्षी १९५ तास वाया जातात. येथील वाहनांचा सरासरी वेग १७.२ किमी/तास आहे. आणि लोक १५ मिनिटांत फक्त ४.३ किमी प्रवास करू शकतात.

१०. बँकॉक (थायलंड)

बँकॉकचा सरासरी वेग २६.१ किमी/तास आहे, परंतु वाहतूकही खूप जास्त आहे. येथील लोक दरवर्षी वाहतुकीत ११५ तास वाया घालवतात. १५ मिनिटांत फक्त ६.५ किमी अंतर प्रवास करू शकतात.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading