Samruddhi Mahamarg Mega Block : समृद्धी महामार्गावर 10 दिवसांचा ब्लॉक!! प्रवाशांना मोठा झटका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Samruddhi Mahamarg Mega Block । मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC ) समृद्धी महामार्गावर ९ दिवसांचा वाहतूक ब्लॉक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ९ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी पर्यंत हा मेगा ब्लॉक असेल. या काळात, हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (HTMS) अंतर्गत गॅन्ट्री बसवल्या जाणार आहेत. हे काम एकूण नऊ टप्प्यात पूर्ण केले जाईल. या मेगा ब्लॉकचा परिणाम बुलढाणा आणि जालना जिल्ह्यातील वाहतुकीवर होईल. त्याठिकाणी वाहतूक अंशतः थांबेल.

एमएसआरडीसीमार्फत हे काम किमी ३०० ते किमी ३६५ (नागपूरपासूनचे अंतर) दरम्यान केले जाणार आहे. यात प्रत्येक टप्प्यादरम्यान वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी बंद असेल. काम पूर्ण होताच वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात येईल, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कामाच्या दरम्यानमुंबई आणि नागपूर दोन्ही दिशांना सुमारे एक तास वाहतूक थांबवली जाईल.नंतर वाहतूक पुन्हा सुरू होईल. यामुळे लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा आणि जालना तालुक्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. Samruddhi Mahamarg

कधी आणि कोणते मार्ग राहणार बंद? Samruddhi Mahamarg Mega Block

9 फेब्रुवारी

किमी 305.750 – मुंबईकडे जाणारी मार्गिका: दुपारी 12 ते 1
किमी 308.700 – मुंबईकडे जाणारी मार्गिका: दुपारी 12 ते 1
किमी 308.700 – नागपूरकडे जाणारी मार्गिका: दुपारी 3 ते 4

10 फेब्रुवारी

किमी 314.250 – मुंबईकडे जाणारी मार्गिका: दुपारी 12 ते 1
किमी 318.500 – मुंबईकडे जाणारी मार्गिका: दुपारी 12ते 1

11 फेब्रुवारी

किमी 318.500 – नागपूरकडे जाणारी मार्गिका: दुपारी 3 ते 4
किमी 329.200 – नागपूरकडे जाणारी मार्गिका: दुपारी 3ते 4

पुढील टप्प्यांबद्दल माहिती आवश्यकतेनुसार अपडेट केली जाईल. एमएसआरडीसीने प्रवाशांना प्रवासात एक तासापर्यंत विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन, आपल्या प्रवासाचे निघण्यापूर्वीच नियोजन करण्याचे आवाहन केलं आहे. तसेच आवश्यक असल्यास, जागेवरील फलक किंवा सूचनांनुसार पर्यायी मार्गांचा वापर करावा असं सांगितलं आहे.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading