Satara News : सातारा एसपींच्या निलंबनाचे आदेश; जिल्हा परिषद राड्यानंतर नीलम गोऱ्हे यांचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीदरम्यान झालेला राडा एसपी तुषार दोषी यांच्यावर उलटला आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा परिषदेत झालेल्या राड्याची संपूर्ण कहाणी विधानपरिषदेत सांगत एसपी तुषार दोषी यांच्या निलंबनाची मागणी केली. यानंतर सभापती नीलम गोर्हे यांनी या संपूर्ण घटनेची गांभीर्याने दखल घेत सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणात पुण्याच्या विभागीय आयुक्तांना लक्ष घालून चौकशीचे आदेश दिले आहेत.

४ दिवसांपूर्वी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडी दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभुराज देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री मकरंद पाटील आणि नितीन पाटील याना धक्काबुक्की झाली. तसेच शिवसेनेचे दोन सदस्यही पळवण्यात आले. आज राज्याच्या अधिवेशनात हा मुद्दा चर्चेत आला. शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावरील आपबिती सांगताना म्हंटल कि, “ज्या दोन सदस्यांवर गुन्हा दाखल झाला होता ते संदीप मांडवे आणि अनिल देसाई हे आमच्यासोबत होते. आमच्या दोन सदस्यांना अटक करायची होती तर हॉटेलबाहेर करायचे होते, तिथे धाडस झाले नाही.

मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे, पण इतका भयानक अनुभव मला कधीही आला नव्हता. मतदान कक्षापासून अवघ्या १० मीटर अंतरावर असताना साध्या वेशातील १०० हून अधिक पोलिसांनी आम्हाला रोखले. मी राज्याचा मंत्री असूनही मला पोलिसांनी अक्षरशः फरफटत नेले. माझ्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. नितीन पाटलांनाही ओढले. जर मंत्र्यांवर अशी वेळ येत असेल, तर सभागृहात आणि राज्यात आम्ही सुरक्षित आहोत की नाही, अशी भीती वाटतेय, असं शंभूराज देसाई यांनी सभागृहात सांगितलं.

शंभूराज देसाई यांच्या समर्थनार्थ सत्ताधारी आमदार आक्रमक झाले. शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी सातारा एसपींना तत्काळ बडतर्फ करत जिल्हाधिकाऱ्यांच्या सुद्धा बदलीची मागणी केली. यानंतर या संपूर्ण घटनेचं गांभीर्य ओळखून सभापती नीलम गोर्हे यांनी साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या निलंबनाचे आदेश दिले. पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्यासह धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणात पुण्याच्या विभागीय आयुक्तांना लक्ष घालून चौकशीचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading