हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sindhudurg-Mumbai Flight | मुंबईतून तळकोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर येतेय. सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळावरून होणारी मुंबई- सिंधुदुर्ग विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या विमानसेवेसाठी १०० टक्के ‘व्हायेबिलिटी गॅप फंडिंग’ देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे या निर्णयाबाबत माहिती दिली.
चिपी विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळं (Sindhudurg-Mumbai Flight) प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी होती. मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा सुरळीत व्हावी, यासाठी पालकमंत्री नीतेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता. अखेर नितेश राणे यांच्या प्रयत्नाना यश आलं असं म्हणावे लागेल.चिपी विमानतळावरील विमानसेवा नियमित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी यासाठी राज्य मंत्रिमंडळाने या सेवेला 100 टक्के ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
राज्य सरकारच्या या आर्थिक पाठबळामुळं आता विमान कंपन्यांना मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमानसेवा दररोज चालवणं शक्य होणार आहे असं नितेश राणे यांनी म्हंटल. फक्त पर्यटनच नव्हे तर आपत्कालीन परिस्थतीत सुद्धा या विमानसेवेचा फायदा होईल. एवढच नव्हे तर गणेशोत्सव, शिमगा, दिवाळी यांसारख्या मोठ्या सणांच्या काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी हि दररोज सुरु होणारी नवीन विमानसेवा (Sindhudurg-Mumbai Flight) वरदान ठरणार आहे.
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे सरकारच्या या निर्णयामुळे कोकणातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिकांच्या प्रवासाला गती मिळणार आहे. यामुळे सिंधुदुर्गात येणार्या पर्यटकांची संख्या वाढणार असून स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि खासगी टॅक्सीचालकांना याचा मोठा फायदा होईल. दरवर्षी सिधुदुर्गात हजारो पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनाला येत असतात. रस्ते आणि रेल्वेमार्गाने प्रवास हा गर्दीचा आणि जास्तीचा वेळ खर्च करणारा असल्याने अनेक प्रवासी विमान प्रवासाला प्राधान्य देतात. आ