हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Water Metro In Mumbai : मेट्रो म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर येईल ती म्हणजे उंच उड्डाण पुलावरून धावणारी मेट्रो ट्रेन. मागील काही वर्षात देशात मेट्रो ट्रेनची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे तसेच प्रवाशांचा प्रवास अतिशय कमी वेळेत आणि सुखकर होत आहे. आता तर हीच मेट्रो तुम्हाला पाण्यावर धावताना दिसेल. होय मुंबईत लवकरच जल मेट्रोला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्राचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी याबद्दल PTIशी बोलताना महिती दिली आहे. येत्या डिसेंबर महिन्यापासून मुंबईत जल मेट्रो टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात येणार आहे असे नितेश राणे यांनी सांगितले.
पीटीआयशी बोलताना राणे म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वॉटर मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) त्यांच्या विभागाकडून २८ फेब्रुवारीपर्यंत सादर केला जाईल. राज्य सरकारने एमएमआरमध्ये सहा ते आठ मार्ग तयार केले आहेत जे वॉटर टॅक्सी प्रकल्पांतर्गत विद्युत चालित बोटींच्या जाळ्याद्वारे जोडले जातील, असे राणे म्हणाले. डीपीआर सादर झाल्यानंतर, मार्गांच्या व्यवहार्यतेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाईल आणि अंतिम मार्गांपैकी दोन मार्ग अंमलबजावणीसाठी प्रथम घेतले जातील, असे ते म्हणाले. Water Metro In Mumbai
कोणकोणत्या मार्गावर धावणार? Water Metro In Mumbai
केरळमधील कोची जल मेट्रोच्या धर्तीवर मुंबईत जल मेट्रो सुरु होणार आहे. मुंबईत सर्वात आधी जल मेट्रो ही नरिमन पॉइंट-वांद्रे-जुहू-वर्सोवा मार्गावर धावेल. आम्ही सुरुवातीच्या टप्प्यात या दोन मार्गांवर जल मेट्रोचे काम सुरू करणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली. दक्षिण मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ कल्ब जेट्टी सुरु करण्याचं काम ही सुरु आहे. यानंतर ही जल मेट्रो मुंबईतील नागरिकांना नवी मुंबई विमानतळावर फक्त 40 मिनिटांत पोहचवू शकेल असे सांगायला ही नितेश राणे विसरले नाहीत.
मुंबई वॉटर मेट्रोची कल्पना इलेक्ट्रिक वॉटर फेरीच्या नेटवर्क म्हणून केली आहे . ही मेट्रो पाण्यावर धावताना मुंबईकरांना पहायला मिळेल. ही वॉटर मेट्रो मुंबई शहर आणि त्याच्या उपनगरातील विविध जेटी आणि वॉटरफ्रंट पॉइंट्सना जोडण्याचे काम करेल. जवळपास 1200 कोटींचा हा प्रकल्प असून मुंबईकरांना प्रवासाचा नवीन अनुभव देणारा ठरणार आहे.