Winter Honeymoon Destinations In Maharashtra : थंडीचा बहर! हनिमूनसाठी महाराष्ट्रातील ‘ही’ ठिकाणं बनतायत पहिली पसंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Winter Honeymoon Destinations In Maharashtra । मित्रानो, सध्या थंडीचे दिवस सुरू असून हनिमून तसेच सुट्टीसाठी पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या या दिवसात जास्त असते. आजकाल बाहेर कोणत्या तरी राज्यात जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रात फिरूनच कमी पैशात आणि महत्वाचं म्हणजे सुरक्षित असे पर्यटन करावे किंवा हनिमून डेस्टिनेशन निवडावे अशी लोकांची मानसिकता झाली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि थंड हवेची ठिकाणं पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहेत. तुम्हीही जानेवारी महिन्यात कुठे हनिमूनचा किंवा पर्यटनाचा प्लॅन करणार असाल तर आज आम्ही तुम्हाला अशीच काही खास ठिकाणे सांगणार आहोत जिथे जाऊन तुम्ही मनसोक्त आनंद लुटू शकता.

महाबळेश्वर

थंडीच्या मोसमात महाबळेश्वर हे नेहमीच पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. थंड वातावरण, दाट धुके, निसर्गरम्य व्ह्यू पॉईंट्स आणि स्ट्रॉबेरीमुळे महाबळेश्वरला मोठी गर्दी होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कपल्स महाबळेश्वरला हनिमूनला जातात आणि तेथील वातावरणाचा आनंद घेत असतात. महाबळेश्वरात वर्षभर असणारं आल्हाददायक आणि थंड हवामानामुळे महाबळेश्वर हे कपल्स साठी खूप आकर्षक ठरते. वेण्णा तलावात बोटिंग, प्रतापगड किल्ला, आणि पंचगंगा मंदिर यांसारखी अनेक ठिकाणे जोडप्यांसाठी उत्तम आहेत.

माथेरान – Winter Honeymoon Destinations In Maharashtra

मुंबईजवळ असलेले माथेरान हे हिल स्टेशन सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्याठिकाणची थंड हवा, दाट धुके, हिरवळ आणि शांत वातावरणामुळे नवविवाहित जोडपी तसेच निसर्गप्रेमी पर्यटक येथे मोठ्या संख्येने येत आहेत. थंडीच्या दिवसात माथेरानचा निसर्ग अधिक खुलून दिसत असल्याने पर्यटनाला बहर आला आहे. वाहनांना बंदी असल्याने माथेरान मधील हवा खूप शुद्ध आणि ताजी असते. याठिकाणी हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षा किंवा घोड्यांचा वापर करावा करणे तसेच ‘नेरळ-माथेरान टॉय ट्रेन’ (Toy Train) हा एक खास अनुभव असतो.

लोणावळा खंडाळा –

माथेरान प्रमाणेच मुंबई–पुणेकरांचे आणखी एक आवडते पर्यटनस्थळ म्हणजे लोणावळा –खंडाळा… लोणावळा शहराला ‘लेण्यांचे शहर’ आणि ‘सह्याद्रीचे रत्न’ असे म्हटले जाते. थंडीच्या दिवसात इथे पर्यटकांचा अक्षरशः ऊत बघायला मिळतो. थंड वातावरण, धुक्याची चादर, धबधबे आणि डोंगरदऱ्यांमुळे हे ठिकाण हनिमून व छोट्या सहलींसाठी लोकप्रिय ठरत आहे. अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स बुकिंग याठिकाणी आधीच करावे लागते. Winter Honeymoon Destinations In Maharashtra

अलिबाग –

मुंबईच्या अगदी खाली असलेल्या सीमेवर वसलेले अलिबाग हे महाराष्ट्र राज्यातील एक छोटेसे किनारपट्टीचे शहर आहे. अलिबागला मिनी गोवा असेही म्हणतात कारण याठिकाणचे वातावरण हे गोव्या सारखेच असते. तुम्ही तुमच्या पार्टनरला घेऊन अलिबागला येऊ शकता.अलिबाग मध्ये अनेक सुंदर व्हिला आणि रिसॉर्ट्स आहेत, जे हनीमूनसाठी खास सोयी देतात. अलिबाग बीच, मांडवा बीच किंवा नागाव बीचसारखे सुंदर समुद्रकिनारे जोडप्यांसाठी बेस्ट ठिकाणी आहेत. शांतता, प्रायव्हसी आणि निसर्गाचा सहवास मिळत असल्याने अलिबाग हे हनिमूनसाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरत आहे.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading