Crime News : नपुंसक असूनही लग्न,नवसाचे खोटे नाटक अन बायकोला मारहाण; संभाजीनगर हादरलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपला मुलगा नपुंसक असूनही एका कुटूंबाने त्याचा विवाह अगदी थाटामाटात लावून दिला आणि एका मुलीचे आयुष्य अक्षरशा उध्वस्त केलं. बायकोने शरीरसंबंधनाची मागणी करताच मी देवाला नवस केल्याचं खोटं संगितलं आणि उलट त्या बायकोलाच मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली. याप्रकरणी पीडितेने थेट पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी सासरच्या १० मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय पीडित महिलेचा विवाह २० मे २०२५ रोजी झाला होता. लग्नानंतर पतीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला आणि आपण देवाला नवस केला आहे असं खोटं कारण सांगून शरीरसंबंध टाळण्याचा सातत्याने प्रयत्न केला. यानंतर काही कमतरता असेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊ असा आग्रह पीडित पत्नीने तिच्या नवर्याकडे केला, मात्र यानंतर तिला मारहाण करण्यास त्याने सुरुवात केली. खरं तर आपला मुलगा नपुंसक आहे याची माहिती त्याच्या घरच्यांना आधीपासूनच होती, मात्र तरीही त्याचे लग्न लावून या कुटुंबाने मुलीच्या आयुष्याशी खेळ केला, तिची फसवणूक केली . मुलाचे कुटुंब एवढ्यावरच थांबलं नाही. त्यांनी नाशिकमधील खुटवडनगर येथे फ्लॅट घेण्यासाठी सदर पीडितेला मारहाण करत घरून १५ लाख रुपये घेऊन ये अशी मागणी केली. जोपर्यंत तू माहेरून पैसे आणत नाहीस तोपर्यंत शरीरसंबंध होणार नाहीत,अशी धमकी तिला देण्यात आली. या काळात सासरच्यांनी तिचे सोन्याचे दागिने आणि शैक्षणिक कागदपत्रेही बळजबरीने काढून घेतले.

सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर पीडितेने छावणी पोलीस स्टेशन गाठलं आणि सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला. ६ सप्टेंबर २०२५ रोजी तिला अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती असं तिने तक्रारीत म्हंटल. तसेच पतीचे त्याच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध असल्याचा खळबळजनक आरोप पीडितेने केला. पीडितेच्या फिर्यादीवरून छावणी पोलिसांनी पती, सासू, जाऊ, दीर आणि नणंद अशा एकूण १० जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading