Karad Crime : कराड तालुक्यातील नामांकित शाळेतील शिक्षकाने 9 वी तील विद्यार्थिनीला केलं प्रपोज
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Karad crime । शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं म्हणजे आदराचे नातं, पवित्र नातं.. परंतु याच नात्याला काळिमा फासणारी घटना कराडमध्ये घडली आहे. व्हॅलेंटाईनडे ला चक्क एका शिक्षकाने नववीतल्या विद्यार्थिनीला प्रपोज केले, तेही शाळेतच.. होय, हि घटना घडली आहे कराड तालुक्यातील मलकापूरात.. याठिकाणी कोयना वसाहत परिसरात असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात हा खळबळजनक प्रकार घडला आहे. एकीकडे संपूर्ण जगात व्हॅलेंटाईन डे चा उत्साह सुरू असतानाच, त्याच दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारीला राजेंद्र कसबे नावाच्या शिक्षकाने त्याच शाळेतील विद्यार्थिनीला प्रपोज केलं. या प्रकारानंतर विद्यार्थिनीने सदर शिक्षकाची पोलीस तक्रार केली आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत पीडित विद्यार्थिनीने केलेल्या दाव्यानुसार, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी शाळेची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास कसबे सर त्या विद्यार्थिनीला वर्गाच्या बाहेर बोलवत होते. त्यावेळी ती तिच्या वर्गातील मैत्रिणींना सोबत घेऊन सदर शिक्षकाला भेटली, मात्र त्यावेळी आरोपी शिक्षकाने इतर मुलींना परत पाठवलं आणि तिला एकटीलाच थांबवलं. त्यानंतर ४ दिवस झाले मी तुला भेटायला बोलवत आहे. तू का आली नाहीस? तू रात्री तीन वाजता व्हॉट्सअप वर ऑनलाईन काय करत होतीस? असे प्रश्न शिक्षकाने विद्यार्थिनीला विचारला. Teacher Proposed To Student
तसेच मी तुला मैत्रीचं बोललो होतो त्याबद्दल तू काहीच सांगितलं नाहीस. आता काय ते सांग. एवढ्या मुली माझ्याकडे बघतात तरी मी तुझ्याकडेच बघतो. नऊवीची शाळा सुरू झाल्यापासून मी तुला प्रेमाचं बोलायचं म्हणतोय. पण मी आता बोलतोय” असं म्हणून सदर आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनीचा हात पकडला, आणि तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणत तिला प्रपोज केलं. त्यानंतर घाबरलेली सदर मुलगी वर्गामध्ये येऊन बसली .
घडलेला संपूर्ण प्रकार विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणींना सांगितला. त्यानंतर घरी गेल्यानंतर भावाला याबद्दल सांगितलं. घरच्यांनी मग कराड शहर पोलीस ठाण्यात सदर शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. मात्र या एकूण प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासला गेला आहे हे मात्र नक्की.









