Karad News : त्या माशाची शिकार महागात!! AN Fish दुकानदारावर गुन्हा दाखल

Karad News : व्यवसाय करताना आपण काय करतोय आणि ग्राहकांना खुश करण्यासाठी कोणकोणत्या युक्त्या वापरतोय याचे अनेकांना भान नसते. असाच प्रकार घडलाय तो कराड तालुक्यात. येथील कोल्हापूर नाका परिसरात असलेल्या AN Fish या प्रसिद्ध मासे विक्री दुकानाच्या दुकानदाराने ग्राहकांना खुश करण्यासाठी एका अनोख्या माशाचा विडिओ व्हायरल केला आणि तिथेच तो फसला. ज्या माशाच्या शिकारीला बंदी आहे, आणि ज्या माशाला धोकादायक म्हणून जाहीर केलं आहे असा मासा या दुकानदाराने आणला तरी कुठून असा प्रश्न पडला आणि याचे धागेदोरे थेट त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यापर्यंत पोहचले.

नेमकं काय आहे प्रकरण ? Karad News

कराड तालुक्यात कोल्हापूर नाक्यावरील AN Fish हे मासे विक्रीचे प्रसिद्ध दुकान आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर ग्राहक याठिकाणी माशांची खरेदी करत असतात. ग्राहकांना नवनवीन माशांची माहिती मिळावी आणि ऑफर्सचा लाभ घेता यावा यासाठी दुकानदार अमीर दस्तगीर नदाफ हे सोशल मीडियावर रिल्स टाकत असतात. अशीच एक रील त्यांनी बो माऊथ गिटारफिश’ची टाकली. आमच्या दुकानात बो माऊथ गिटारफिश उपलब्ध असून ग्राहकांनी लवकरात लवकर यावे असे आवाहन नदाफ यांनी सोशल मीडियावर केलं आणि इथेच ते अडचणीत आले. कारण बो माऊथ गिटारफिश हा दुर्मिळ मासा हा धोकादायक असल्याचे यापूर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावर आययूसीएन (इंटरनॅशनल युनियन फॉर नेचर) संस्थेने जाहीर केलं होत.

अमीर नदाफ यांनी यांनी या माशाचा व्हिडिओ प्रसारित केल्याची आणि माशाचे सार्वजनिक प्रदर्शन केल्याची माहिती थेट वनविभागाला मिळाली . या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने कारवाई करीत अमीर दस्तगीर नदाफ (रा. मलकापूर, कराड) आणि ओमकार राजेंद्र मेळवणे (रा. गुरुवार पेठ, सातारा) या दोन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सदर कार्यवाही मा. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव, वनक्षेत्रपाल ललिता पाटील, वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे,वनपाल आनंद जगताप, वनपाल सुनिल शिंदे, वनरक्षक कैलास सानप, वनरक्षक अभिजीत शेळके, वनरक्षक अक्षय पाटील, वनरक्षक मुकेश राऊळकर हे सहभागी होते..

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading