हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rahul Gandhi Death Threat । काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी याना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. करणी सेनेच्या नेत्याकडून थेट विडिओच्या माध्यमातून हि खुली धमकी देण्यात आली आहे. ज्या प्रकारे काँग्रेसच्या २५ खासदारांनी भारताच्या संसदेत घुसून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शिवीगाळ केली. त्यामुळे भाजपा आणि करणी सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे, पुन्हा अशी घटना घडली, राहुल गांधींना घरात घुसून गोळ्या घालू”, अशी धमकी सदर नेत्याने दिली आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी X वर व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली. त्यांनी म्हंटल कि, संपूर्ण आरएसएस-भाजप नेटवर्क “गोडसे फॅक्टरी” सारखे काम करत आहे. करणी सेनेने राहुल गांधी आणि २५ खासदारांना दिलेल्या धमक्या ही एकट्या घटनेत नव्हे तर एका सुनियोजित कटाचा भाग असल्याचे दिसून येते. त्यांनी पुढे म्हंटल आहे की किरेन रिजिजू यांनी पूर्वी दावा केला होता की काँग्रेस खासदारांनी लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांचा अपमान केला होता, परंतु व्हिडिओमध्ये असे काहीही दिसत नाही. उलट, सभापती हसताना दिसत आहेत. यानंतर, अनेक भाजप नेत्यांनी राहुल गांधी हे देशाच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे विधान पुन्हा पुन्हा सुरू केले. हे सर्व विरोधकांना बदनाम करण्याचा आणि विशेषतः राहुल गांधींविरुद्ध वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. धर्मांध राजकारण असेच चालते – प्रथम खोटे पसरवा, नंतर ते पुन्हा पुन्हा सांगा, त्यांना बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करा आणि लोकांमध्ये राग आणि द्वेष निर्माण करा. गोडसेची निर्मिती भूतकाळात असे वातावरण निर्माण करून झाली होती आणि आताही असेच वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप पवन खेरा यांनी केला. Rahul Gandhi Death Threat
पूरा RSS-भाजपा तंत्र एक “गोडसे फैक्ट्री” है।
— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) February 19, 2026
तथाकथित करणी सेना द्वारा राहुल गांधी और “25 सांसदों” के खिलाफ दी गई धमकी कोई अलग-थलग पड़ी घटना नहीं है। यह एक सुनियोजित और कपटपूर्ण साज़िश का हिस्सा है।
▪️पहले, @KirenRijiju ने सार्वजनिक रूप से झूठ बोला और देश को गुमराह किया कि… pic.twitter.com/jB8HjM9MdP
धमकी देणाऱ्याच्या व्हिडिओत काय?
करणी सेनेच्या नेत्याने दिलेल्या धमकीच्या व्हायरल व्हिडिओत तो म्हणतो कि, ज्या प्रकारे भारताच्या संसदेमध्ये घुसून काँग्रेसच्या २५ खासदारांनी ओम बिर्ला यांना शिवीगाळ केला. या घटनेचा आम्ही भाजप आणि करणीसेनेचे कार्यकर्ते निषेध करतो. राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून हे केले गेले. राहुल गांधींनी नीट ऐकावे, पुन्हा अशी घटना घडली तर घरात घुसून गोळ्या घालून मारू आणि याला प्रशासन जबाबदार असेल. काँग्रेसच्या २५ खासदारांवर कारवाई झाली पाहिजे. मोदी सरकारचे मंत्री किरेन रिजिजू यांचे विधान ऐकल्यापासून आम्ही खूप रागात आहोत. जर २४ तासांमध्ये त्या २५ खासदारांना अटक होत असेल तर ठिक आहे. नाही तर प्रत्येकाला घरात घुसून आम्ही गोळ्या घालू. मला जेल झाली तरी चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही.’