हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bank Holidays | तुमचं जर या आठवड्यात बँकेत काही कामे असतील तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण या आठवड्यात तब्बल ४ दिवस बँकाना सुट्टी असणार आहे. अर्थातच ही सुट्टी वेगवेगळ्या राज्यानुसार वेगवेगळ्या भागात असेल. अशावेळी काही महत्त्वाच्या कामासाठी बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची सविस्तर यादी जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. चला तर मग जाणून घेऊया नेमक्या कोणकोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत.
1) 18 फेब्रुवारी –
18 फेब्रुवारी रोजी लोसार सणामुळे फक्त सिक्कीम राज्यातील बँका बंद राहतील. देशाच्या उर्वरित भागात बँकाचे कामकाज नियमितपणे सुरू राहील.
2) 19 फेब्रुवारी – Bank Holidays
19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती असल्याने त्यानिमित्त फक्त महाराष्ट्रातील बँका बंद राहतील. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने शिवजयंती मोठ्या उत्साहात राज्यात साजरी केली जाते. बाकी उर्वरित देशभरात बँका खुल्या राहतील. Bank Holidays
3) 20 फेब्रुवारी –
20 फेब्रुवारी रोजी देशातील दोन राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल. ही राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम. राज्य स्थापना दिनानिमित्त अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममध्ये या दिवशी बँका बंद राहतील. बाकी या दिवशी देशाच्या इतर राज्यात बँका सुरूच असतील .
4) 22 फेब्रुवारी –
22 फेब्रुवारी रोजी रविवार आहे असल्याने या दिवशी संपूर्ण देशभरातील बँका बंद राहतील.
वरील चार दिवशी जरी बँकांना सुट्टी असल्या तरी ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून तुम्ही बँकांची कामे मोबाईलवरून करू शकता. तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे वापरकर्त्यांना अन्यथा सूचित केले नसल्यास, आपत्कालीन परिस्थितीत एटीएममधून रोख रक्कम काढता येईल आणि अॅप आणि यूपीआय नेहमीप्रमाणे काम करेल. त्यामुळे ग्राहकांना चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही.