Free Gas Cylinder : आता फुकट मिळणार गॅस सिलिंडर; सरकारची सर्वात मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Free Gas Cylinder । सर्वसामान्य ग्राहकांसाठी आता अतिशय आनंदाची बातमी आहे. आपल्या रोजच्या जीवनातील जीवनावश्यक वस्तू असलेला गॅस सिलेंडर आता अगदी मोफत मिळणार आहे. होय, तुम्ही वाचतायत ते अगदी बरोबर आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांचा खर्च वाचवा यासाठी घरगुती गॅस सिलेंडर सरकरकडून मोफत मिळणार आहे. मात्र महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीत हि योजना सुरु झाली आहे. त्यामुळे दिल्लीकरांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण बघायला मिळतेय.

दिल्ली सरकारने होळी आणि दिवाळी या २ महत्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली असून यासाठी तब्बल ३०० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. खरं तर भाजपने निवडणूक प्रचाराच्या वेळीच याबाबत आश्वासन देण्यात आलं होते. तेच आता सरकारने पूर्ण केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे सिलिंडरची किंमत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, ज्यामुळे योजनेत पारदर्शकता राहील आणि पैशाचा कोणताही गैरव्यवहार होणार नाही.

होळीचा सण सध्या तोंडावर आला आहे. त्यानिमित्ताने पहिला मोफत सिलिंडर वितरित केला जाईल. संपूर्ण रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे हस्तांतरित केली जाईल. ४ मार्च रोजी होळी साजरी केली जाईल आणि ही रक्कम त्या तारखेपूर्वी दिल्लीत राहणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा केली जाईल. तर वर्षातील दुसरा मोफत सिलिंडर दिवाळीनिमित्त दिला जाईल. या योजनेचा फायदा अशा महिलांना होईल ज्यांच्याकडे वैध रेशन कार्ड आहे आणि सरकारने ठरवून दिलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करतात. सरकारच्या या निर्णयामुळे केवळ घरगुती खर्चातच दिलासा मिळणार नाही तर अतिरिक्त भार न पडता सण साजरा करता येणार आहे. दिल्लीतील महिलांना याचा विशेष फायदा होईल आणि महिलावर्ग सरकारवर खुश होईल.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading