ICICI Bank Credit Card : ICICI बँकेच्या ग्राहकांना धक्का!! Credit Card च्या नियमांत मोठे बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ICICI Bank Credit Card । ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लाखो ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. ICICI च्या क्रेडिट कार्डवरून चित्रपट तिकिटे, प्रवास, ऑनलाइन पेमेंट आणि डिजिटल व्यवहारांवर मिळणाऱ्या सवलतींमध्ये आता मोठे बदल होणार आहेत. १ फेब्रुवारी २०२६ पासून ICICI बँक त्यांच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये व्यापक सुधारणा लागू करणार असून, काही सुविधा पूर्णपणे बंद केल्या जाणार आहेत, तर काही व्यवहारांवर थेट अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. या नव्या नियमाचा थेट परिणाम सर्वसामान्य कार्डधारकांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे.

BookMyShow वरील मोफत चित्रपट लाभ बंद

चित्रपटप्रेमींसाठी ही सर्वात मोठी निराशाजनक बातमी ठरू शकते. ICICI बँकेने इन्स्टंट प्लॅटिनम चिप क्रेडिट कार्ड आणि इन्स्टंट प्लॅटिनम क्रेडिट कार्डवर BookMyShow द्वारे दिला जाणारा मोफत चित्रपट तिकीट लाभ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारीपासून या कार्डांवर मोफत किंवा सवलतीच्या तिकिटांचा कोणताही लाभ मिळणार नाही. हा लाभ विशेषतः तरुण आणि शहरी ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होता.

दुसरीकडे ICICI बँक HPCL सुपर सेव्हर क्रेडिट कार्डधारकांना विमा हप्त्यांच्या पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट्स देत राहणार आहे. मात्र, यासाठी कमाल मर्यादा ४०,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसेच कार्डच्या प्रकारानुसार, वाहतूक व्यापारी श्रेणीतील १०,००० ते ४०,००० रुपयापर्यंतच्या खर्चावर रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.

ऑनलाइन गेमिंग आणि वॉलेट व्यवहारांवर नवे शुल्क

डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठीही नियम कठोर झाले आहेत. १५ जानेवारी २०२६ पासून ड्रीम११, एमपीएल, जंगली गेम्स आणि रमी कल्चर यांसारख्या ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या व्यवहारांवर २ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. याशिवाय, अमेझॉन पे, पेटीएम आणि मोबीक्विकसारख्या थर्ड-पार्टी वॉलेटमध्ये ५,००० रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम लोड केल्यास १ टक्का शुल्क द्यावे लागणार आहे.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading