हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Jio Recharge Plans ।आजकाल वाढत्या महागाईसोबत मोबाईल रिचार्जच्या किमती सुद्धा गगनाला भिडल्या आहेत. रिचार्ज करायचं म्हंटल कि सर्वसामान्य माणसाच्या अंगावर अक्षरशः काटा येतो. अशावेळी स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन कोणता आहे ते पाहून ग्राहक मोबाईलला रिचार्ज करत असतात. आज आम्ही तुम्हला अशाच एका रिचार्ज प्लॅनबाबत सांगणार आहोत ज्याची किंमत फक्त १२३ रुपये आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला असा हा रिचार्ज प्लॅन आहे. चला या रिचार्ज प्लॅनबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
आम्ही ज्या १२३ रुपयांच्या रिचार्जबाबत (Jio Recharge Plans) बोलत आहोत तो आहे जिओ कंपनीचा रिचार्ज प्लॅन. कमी किंमत असूनही या प्लॅनमध्ये आवश्यक ते मूलभूत फायदे देण्यात आले आहेत. या 123 रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 0.5 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची राहील. म्हणजेच संपूर्ण २८ दिवसाच्या व्हॅलिडिटीनुसार, एकूण 14 जीबी डेटा या प्लॅनमध्ये ग्राहकांना मिळेल. इंटरनेट डेटासोबतच या १२३ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच लोकल तसेच एसटीडी कॉल्सवर कोणतीही मर्यादा नाही. याशिवाय वापरकर्त्यांना एकूण 300 एसएमएसची सुविधाही मिळते.
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जिओ या १२३ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसोबत जिओ टीव्ही आणि जिओ सावन (JioSaavn) यांसारख्या लोकप्रिय अॅप्सचा मोफत ऍक्सेस मिळत आहे. म्हणजेच काय तर या डिजिटल सेवांसाठी वापरकर्त्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे हा जिओ चा हा 123 रुपयांचा स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन फक्त जिओ भारत फोन वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध आहे. ज्या ग्राहकांकडे जिओ भारत मोबाईल आहे, तेच या प्लॅनचा लाभ घेऊ शकतात. बाकी इतर स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी हा प्लॅन लागू नाही. त्यामुळे कमी बजेटमध्ये मोबाईल सेवा वापरणाऱ्या जिओ भारत वापरकर्त्यासाठीच हा प्लॅन अतिशय फायदेशीर आणि पैशाची बचत करणारा आहे.