हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana । महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी समोर येतेय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी सरकारने e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. मात्र अनेक महिलांना e-KYC करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला, त्यामुळे बहुतांश महिला या योजनेतून बाहेर जातात कि काय? अशी भीती निर्माण झाली. त्यातच e-KYC प्रक्रिया करताना काही महिलांकडून चुकून चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे त्यांच्या खात्यातील लाभ स्थगित झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेत एक हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. ज्यावर फोन लावून महिला आपल्या तक्रारींचे निवारण करतील. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
१८१ या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा-
याबाबत अदिती तटकरे यांनी ट्विट करत म्हंटल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) : लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाइन नंबर …. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत. या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी १८१ या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन १८१ या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे. तरी, सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाइन नंबर
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) January 23, 2026
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत. या व योजनेशी संबंधित इतरही… pic.twitter.com/B2mi5KmKxT
लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना मिळावा, कोणीही या योजनेतून वंचित राहू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीनेच सरकारने हेल्प लाईन क्रमांक जारी केला आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यापूर्वी सरकारने हे पाऊल उचलल्याने महिलांना आपल्या तक्रारीत आता थेट कॉल करून सोडवता येतील आणि या योजनेचा लाभ इथून पुढेही घेता येईल. दर महिन्याला मिळणारे १५०० रुपये महिलांसाठी लाख मोलाचे ठरत आहेत. या पैशांमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चांगलाच हातभार लागला असून संपूर्ण राज्यभरातील महिलावर्गात मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतेय.