Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, आता 1500 ऐवजी 2100 मिळणार; शिंदेंची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना १५०० रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून केली जाते, मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर १५०० ऐवजी २१०० रुपये दर महिन्याला देऊ असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वीच सरकारमधील प्रमुख नेत्यांकडून देण्यात आलं होते. परंतु सरकार स्थापन होऊन वर्ष उलटून गेलं, तरीही लाडक्या बहिणींना २१०० रुपये काही मिळाले नाहीत. त्यामुळे सरकारने आपली फसवणूक केल्याची भावना महिलांच्या मनात आहे. विरोधकांनी सुद्धा २१०० रुपयांच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मात्र आता याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) २१०० रुपयांबाबत मोठी घोषणा केली आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची कोल्हापुरातील कागल मध्ये प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना एकनाथ शिंदेनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिली. दर महिन्याला ओवाळणी देणारा हा तुमचा भाऊ आज केवळ मते मागायला नाही, तर तुमचा सन्मान वाढवायला आला आहे.” लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेत वाढ करून ती 2100 रुपये केली जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच ज्या उमेदवाराच्या मागे महिला शक्ती असते, त्याचा विजय हा निश्चित असतो हे सांगायलाही एकनाथ शिंदे विसरले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे 5 आमदार आणि 1 खासदार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा शिवसेना आणि महायुतीचा विजय अटळ असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

फक्त घोषणा, कृती कधी करणार? Ladki Bahin Yojana

दरम्यान, लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी आम्ही २१०० रुपये देऊ अशी फक्त पोकळ घोषणाच सरकार कडून देण्यात येतेय. प्रत्यक्षात त्यासंदर्भात कोणत्याही हालचाली सरकार कडू होताना दिसत नाही. यापूर्वी नगरपालिका आणि महानगर पालिका निवडणुकीत सुद्धा आम्ही योग्य वेळ आल्यावर लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असं सरकार मधील मंत्र्यांकडून सांगण्यात आलं होते. आताही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तेच आश्वासन देऊन महिलांना फसवण्याचा प्लॅन मंत्र्यांकडून सुरु आहे असं चित्र आहे. योग्य वेळ येणार तरी कधी? असा सवाल महिलांकडून केला जात आहे.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading