LPG Gas Cylinder Price Hike : LPG गॅस सिलेंडर महागला!! सर्वसामान्यांना मोठा झटका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन LPG Gas Cylinder Price Hike । आज केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी सर्वसामान्य जनतेला मोठा झटका बसला आहे. जीवनावश्यक वस्तू बनवलेल्या गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. LPG गॅस सिलेंडर ४९ रुपयांनी महागला आहे. मात्र हि दरवाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरबाबत झाली आहे. १४ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. परंतु व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्याने आता हॉटेल आणि रेस्टोरंट मधील जेवण सुद्धा महाग होण्याची शक्यता आहे.

भारत आपल्या घरगुती एलपीजी वापरापैकी ६०% पेक्षा जास्त आयात करतो. घरगुती एलपीजीसाठी, सरकार ग्राहकांसाठी योग्य किंमत नियंत्रित करत असते. पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, व्यावसायिक एलपीजीच्या किमती विपणन कंपन्या स्वतंत्रपणे ठरवतात. एलपीजीच्या किमतींच्या शेवटच्या मासिक आढाव्यात, १ जानेवारी २०२६ रोजी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत १६९१.५० रुपये होती, जी डिसेंबरच्या तुलनेत सुमारे ११० रुपयांनी जास्त होती. आज मात्र दिल्लीमध्ये, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किरकोळ विक्री किंमत १७४०.५० रुपये झाली आहे.

कोलकत्तामध्ये 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता 1,844.50 रुपये, तर मुंबईत हे सिलेंडर 1,692.00 रुपयांना मिळणार आहे. चेन्नईत या किंमती सर्वात महाग आहे. याचा भाव चेन्नईत 1,899.50 रुपये इतकी आहे.

घरगुती गॅसच्या किमती स्थिर – LPG Gas Cylinder Price Hike

दुसरीकडे, घरगुती 14.2 किलो LPG सिलेंडरच्या किमती जैसे थे पाहायला मिळत आहे. घरगुती गॅसचा भाव गेल्या वर्षी 8 एप्रिल 2025 रोजी बदलला होता. तेव्हापासून या किंमती जैसे थे आहेत. दिल्लीमध्ये 853 रुपये, कोलकातामध्ये 879, मुंबईत 852.50 आणि चेन्नईमध्ये 868.50 रुपयांत घरगुती गॅस सिलेंडर मिळतोय.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading