PM Kisan Yojana : PM किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन PM Kisan Yojana। शेतकऱ्याच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मोदी सरकारने २०१९ पासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. २००० रुपयांच्या एकूण ३ हप्त्याच्या जोरावर हे पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले जातात. आत्तापर्यंत या योजनेचे २१ हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले असून आता २२ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळू शकतो.

ई केवायसी अनिवार्य – PM Kisan Yojana

पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमच्या बँक खात्यात २००० रुपये जमा होणार नाही. जोपर्यंत तुम्ही ई केवायसी करत नाही तोपर्यंत तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. याचसोबत जमिनीचे व्हेरिफिकेशन करणेदेखील गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. PM Kisan Yojana

फार्मर्स आयडी सुद्धा अनिवार्य –

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आता फार्मर्स आयडी सुद्धा असणे आवश्यक आहे. फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्यांचे डिजिटल प्रोफाईल आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घेण्यासाठी ही ओळख अतिशय महत्वाची आहे. हे एक युनिक ओळखपत्र आहे ज्याच्या आधारे तुम्हाला कोणती योजना लागू होते, किती सबसिडी मिळू शकते, याबद्दल सगळी माहिती समजते.

यापूर्वी कधी मिळाला होता २१ वा हप्ता –

दरम्यान, यापूर्वी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोइम्बतूर येथून डीबीटीद्वारे १८,००० कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा त्यावेळी जमा झाले होते.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading