हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन PM Kisan Yojana 22nd Installment। शेतकऱ्याच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मोदी सरकारने २०१९ पासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. २००० रुपयांच्या एकूण ३ हप्त्याच्या जोरावर हे पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले जातात. आत्तापर्यंत या योजनेचे २१ हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले असून आता २२ वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्याचं लक्ष्य लागून राहिले आता. आता मात्र या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपण्याची वेळ आली आहे. सरकारकडून या हप्त्याबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
13 मार्च रोजी मिळणार पैसे- PM Kisan Yojana 22nd Installment
मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा २२ वा हप्ता (PM Kisan Yojana 22nd Installment) १३ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. त्यामुळे पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा होणार आहेत. या संदर्भात सरकारने अधिकृत माहिती देखील दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील पीएम किसानच्या अधिकृत खात्यावर पोस्ट करून ही तारीख जाहीर करण्यात आली. या पोस्टनुसार, १३ मार्च रोजी २२ वा हप्ता जारी केला जाणार आहे.
Honoring our #Annadata, 22nd Instalment of #PMKISAN will be released on 13th March 2026.#PMKISAN #22ndinstalment #PMKisansammannidhi@OfficeofSSC @AgriGoI @mygovindia @icarindia @DDKisanChannel @MoRD_GoI @RNK_Thakur @PMOIndia @PIB_India pic.twitter.com/aTYBdlyGKF
— PM Kisan Samman Nidhi (@pmkisanofficial) March 9, 2026
यापूर्वी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोइम्बतूर येथून डीबीटीद्वारे १८,००० कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा त्यावेळी जमा झाले होते. त्यानंतर पुढचा म्हणजेच २२ वा हप्ता हप्ता फेब्रुवारीच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. त्यानंतर होळीपूर्वी पैसे मिळू शकतात, अशी चर्चा सुरू होती. पुढे काही अहवालांमध्ये असे सूचित करण्यात आले की हा हप्ता १३ मार्चला येऊ शकतो, कारण त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसाम दौऱ्यावर असणार आहेत आणि अखेर हेच खरं ठरल. PM Kisan Yojana 22nd Installment
दरम्यान, जरी १३ मार्चला पीएम किसान योजनेचे २००० रुपये शेतकऱ्यांना मिळणार असले तरी काही शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी पूर्ण केले नसेल, तर त्याचा हप्ता थांबू शकतो . याशिवाय, आता शेतकरी ओळखपत्र सुद्धा आवश्यक असेल. ज्यांनी अजूनही त्यांचं शेतकरी ओळखपत्र बनवलेलं नाही असे शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. याशिवाय जमिनीच्या पडताळणीशी संबंधित माहिती चुकीची दिली असेल, तरीही हप्ता रोखला जाऊ शकतो किंवा उशिरा मिळू शकतो.