SBI ATM Charge Hike : ATM मधून पैसे काढणे महागले; SBI चा ग्राहकांना दणका

SBI ATM Charge Hike : देशातील आघाडीची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. या ग्राहकांना एटीएम मधून पैसे काढणे आता महाग होणार आहे. स्टेट बँकेने एटीएम व्यवहार शुल्क वाढवले ​​आहे. या नवीन बदलामुळे ग्राहकांचे अतिरिक्त पैसे खर्च होणार आहेत. इंटरचेंज शुल्कात वाढ झाल्यामुळे बँकेने एटीएम शुल्कात वाढ झाल्याचे सांगितलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे एसबीआयने यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये एटीएम व्यवहार शुल्कात वाढ केली होती.

किती रुपयांची वाढ ? SBI ATM Charge Hike

एसबीआय मध्ये जे कोणाचे सेविंग अकाउंट असेल तर त्या खातेदार ग्राहकांना इतर बँकांच्या एटीएममधून दर महिन्याला ५ मोफत आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहार असे १० व्यवहार करता येतील. मात्र हि मर्यादा ओलांडल्यानंतर तु्म्हाला २३ रुपये आणि जीएसटी द्यावा लागणार आहे. यापूर्वीहेच शुल्क २१ रुपये + GST ​​असं होत. तर नॉन फायनान्शियर ट्रान्झॅक्शनवर प्रत्येक व्यवहारासाठी १० रुपयांऐवजी ११ रुपये आणि जीएसटी लागेल. बँकेने म्हटले आहे की जर ग्राहकांना वारंवार इतर बँकांचे एटीएम वापरावे लागतील तर आता जास्तीचे पैसे जरूर खर्च करावे लागतील. परंतु जर तुम्ही एसबीआय एटीएममधून पैसे काढले तर मात्र कोणताही आर्थिक त्रास होणार नाही. अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी बँकेने ग्राहकांना यूपीआय, योनो अॅप किंवा शाखांमध्ये डिजिटल पद्धती वापरण्याचा सल्ला दिला आहे. वाढत्या बँक खर्चामुळे होणारा हा एक छोटासा पण महत्त्वाचा बदल आहे. SBI ATM Charge Hike

दरम्यान, बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (BSBD ) खातेधारकांसाठी सध्याच्या सेवा शुल्कात कोणताही बदल झालेला नाही. एसबीआय डेबिट कार्ड धारक जर एसबीआयचे स्वतःचे एटीएम किंवा एडीडब्ल्यूएम वापरत असतील तर त्यांना त्यांच्या व्यवहार सेवा शुल्कात कोणताही बदल करावा लागणार नाही. पुढील सूचना मिळेपर्यंत एसबीआय एटीएममध्ये कार्डलेस रोख रक्कम काढणे (योनो कॅश सारखे) मोफत आणि अमर्यादित राहील. त्यामुळे या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading