Union Budget 2026 : रेल्वेच्या तिकिटात 50% सूट ?? अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Union Budget 2026 । १ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात देशातील शेतकरी, कष्टकरी नोकरदारवर्ग, व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेसाठी तसेच शिक्षण, आरोग्य, क्षेत्रासाठी कोणकोणत्या घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मागील काही वर्षात देशातील रस्ते वाहतूक आणि रेल्वे प्रवासात अनेक चांगले बदल बघायला मिळाले. त्यातच यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे प्रवाशांसाठी (Indian Railways) आनंदाची बातमी मिळू शकते असाही अंदाज बांधला जात आहे

एका वृत्तवाहिनीवरील विशेष कार्यक्रमात असे भाकित करण्यात आले होते की आगामी अर्थसंकल्प रेल्वे तिकिटांच्या भाड्यात मोठ्या प्रमाणात सवलत मिळू शकतो. हि सवलत देशातील जेष्ठ नागरिकांसाठी असेल. ६० वर्षे आणि त्यावरील जेष्ठ पुरुषांना रेल्वे तिकिटांवर ४०% पर्यंत सूट मिळण्याची अपेक्षा आहे. तर ५८ वर्षे आणि त्यावरील जेष्ठ महिलांसाठी रेल्वे तिकिटावर ५०% पर्यंत सूट देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास खर्च कमी करणे आणि रेल्वे प्रवास अधिक सोप्पा आणि परवडणारा बनवणे हाच यामागचा सरकारचा हेतू असल्याचं बोललं जातंय. शिवाय, देशातील रेल्वे पायाभूत सुविधा आणि सेवांचा विस्तार करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात अनेक नवीन घोषणा करण्याची अपेक्षा आहे.

मार्च २०२० पर्यंत, भारतीय रेल्वेने आपल्या ज्येष्ठ प्रवाशांची विशेष काळजी घेतली होती, परंतु कोरोनाच्या काळात ही सुविधा थांबवण्यात आली होती. आता, ही सुविधा पुन्हा सुरू करण्याबाबत अर्थ मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयात चर्चा झाल्याच बोललं जातंय आहे. जर हा प्रस्ताव अर्थसंकल्पात मंजूर झाला तर ६० वर्षे आणि त्यावरील पुरुष आणि ५८ वर्षे आणि त्यावरील महिला पुन्हा एकदा सवलतीच्या दराचा आनंद घेऊ शकतील. ही सवलत स्लीपरपासून एसी फर्स्ट क्लासपर्यंत सर्व वर्गांना लागू होऊ शकते, ज्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या पैशाची बचत होईल.

उदाहरण द्यायचं झाल्यास, समजा फर्स्ट एसी तिकिटाची किंमत ३,००० रुपये असेल तर ५० टक्क्याच्या सवलतीसह महिला प्रवाशांना फक्त १,५०० द्यावे लागतील. तर जेष्ठ पुरुषांना प्रवाशांना ४० टक्क्यांच्या सवलतीसह १,२०० रुपयांची सूट मिळेल आणि त्यांना फक्त १,८०० रुपये भरावे लागतील.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading