Union Budget 2026 : बजेटनंतर Mobile स्वस्त होणार की महाग? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Union Budget 2026 । १ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात देशातील शेतकरी, कष्टकरी नोकरदारवर्ग, व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेसाठी तसेच शिक्षण, आरोग्य, क्षेत्रासाठी कोणकोणत्या घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अर्थसंकल्पात काय महाग होणार आणि काय स्वस्त होणार याची सर्वानाच उत्सुकता असते. अशीच आपल्या जीवनातील जीवनावश्यक वस्तू म्हणजे मोबाईल. मोबाईल वापरत नाही असा माणूस देशात शोधूनही सापडणार नाही. कमी पैशात आकर्षण मोबाईल खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात मोबाईलच्या किमती कमी होणार कि वाढणार? हे सर्वसामान्य ग्राहकांना जाणून घ्यायचं आहे.

मोबाईल स्वस्त होणार कि महाग ? Union Budget 2026

तज्ञांचे म्हणणे आहे की जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या वाढत्या मागणीमुळे मेमरी चिप्स आणि इतर आवश्यक घटकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. पुरवठा साखळीवरील दबावामुळे स्मार्टफोन उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांकडे किमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही. परंतु मागणी कमी होऊ नये म्हणून ते फोन खूप महाग करण्याचे टाळत आहेत. Union Budget 2026

तज्ज्ञांचे काय मत आहे?

रिअलमीचे माजी सीईओ आणि सध्या एआय+ स्मार्टफोन्सचे सीईओ माधव शेठ यांचे मत आहे की भारताचे तंत्रज्ञान क्षेत्र एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. आपण आता फोन असेंबल करण्यापलीकडे जावे. एआय-सपोर्टेड मोबाईलच्या मागणीमुळे आधीच किमती वाढल्या आहेत. बजेटमध्ये सरकारने फक्त असेंबल करण्यावरच नव्हे तर ‘डीप व्हॅल्यू क्रिएशन’वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच भारताने आता कॅमेरा मॉड्यूल, बॅटरी आणि पीसीबी सारखे प्रमुख घटक स्वतः तयार केले पाहिजेत. यासाठी आपण अजूनही आयातीवर अवलंबून आहोत. जर बजेटमध्ये या घटकांच्या निर्मितीसाठी कर सवलती किंवा प्रोत्साहने दिली गेली तर खर्च कमी होऊ शकतो आणि मोबाईलच्या किमती स्थिर राहू शकतात किंवा कमीही होऊ शकतात. .

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading