Budget 2026 : अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा!! कोणत्या क्षेत्राला काय मिळणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. आपल्या भाषणात अर्थमंत्र्यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा करत देशवासियांना पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. आत्मनिर्भर भारत हेच सरकारचे लक्ष्य आहे. त्यासाठी आपल्याला आयात कमी करून निर्यात वाढवायचे आ. हे लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन निर्मला सीतारामन यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच दिले.

कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढवू देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर आमचा भर राहील. गुंतवणूक वाढवण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. कॅन्सर आणि मधुमेहावर औषध स्वस्त करणार. फार्मासाठी दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून भारत बायोफार्मची शक्ती बनेल. आर्थिक विकासात वाढ करणार आणि गरीब कल्याणवर सरकारचा अधिक फोकस असेल असे निर्मला सीतारामन यांनी म्हंटल.

निर्मला सीतारामन यांच्या घोषणा –

कॅन्सर आणि मधुमेहावर औषध स्वस्त करणार

फार्मासाठी दहा हजार कोटींची तरतूद

सरकार तीन केमिकल पार्क उभे करणार

जागतिक-मानक औषध नियामक स्थापन करेल

खनिज कॉरिडोअर आंध्र प्रदेश, ओडिसा आणि केरळला होणार

इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स उत्पादनासाठी 40,000 कोटींचा प्रस्ताव

गरीब कल्याणवर सरकारचा अधिक फोकस

पर्यटन वाढीसाठी सी प्लॅन सुरु करणार

भारताला औषध निर्मितीचे हब बनवू.

पायाभूत सुविधा, एमएसएमई आणि उद्योगांना चालना देऊ

दुर्मिळ रेअर अर्थ मॅग्नेट कॉरिडॉर तयार करणार

वाराणसी आणि पटनामध्ये जहाज केंद्र उभे करणार 

वस्त्रोद्योग क्षेत्रात कौशल्य वाढवण्यासाठी ‘समर्थ २.०’ चे लक्ष्य

आव्हानात्मक स्थितीत मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्याचा प्रस्ताव

प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारणार

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading