Union Budget 2026 : उद्याचा अर्थसंकल्प Live कुठे पहाल? एका Click वर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Union Budget 2026 । १ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात देशातील शेतकरी, कष्टकरी नोकरदारवर्ग, व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेसाठी तसेच शिक्षण, आरोग्य, क्षेत्रासाठी कोणकोणत्या घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अर्थसंकल्पात काय महाग होणार आणि काय स्वस्त होणार याची सर्वानाच उत्सुकता असते. अशावेळी हा अर्थसंकल्प थेट लाईव्ह कुठे पाहावा याची उत्सुकता तर प्रत्येकालाच असणार ना? चला तर मग आम्ही सांगतो.

दरवेळी प्रमाणे, यावर्षी सुद्धा अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषण देतील. अर्थमंत्र्यांचे भाषण अंदाजे ६० ते ९० मिनिटे असू शकते. भाषणानंतर, सर्व अर्थसंकल्पीय कागदपत्रे लोकसभा आणि राज्यसभेत सादर केली जातील.

अर्थसंकल्पीय भाषण नवी दिल्लीतील संसद भवनातून प्रसारित केले जाईल आणि दूरदर्शन आणि संसद टीव्हीद्वारे टीव्हीवर थेट पाहता येईल. संसद टीव्ही, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) इंडियाचे YouTube चॅनेल आणि सरकारी वेबसाइट, indiabudget.gov.in वर सकाळी ११ वाजता ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीम उपलब्ध असेल. भाषण सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी प्रसारण सुरू होईल, यामुळे प्रेक्षकांना वेळ मिळेल.

जर कोणी बजेट लाईव्ह पाहू शकत नसेल, तर ते नंतर संसद टीव्ही आणि पीआयबीच्या यूट्यूब चॅनेलवर सहजपणे पाहता येईल. यासोबतच, बजेटशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती, जसे की बजेट सारांश, कर संबंधित सूचना आणि खर्चाची संपूर्ण माहिती indiabudget.gov.in आणि पीआयबी वेबसाइटवर उपलब्ध असेल.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading