भारतीय क्रिकेट संघाचा किंग म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली (Virat Kohli) हा सामन्यादरम्यान अतिशय केंद्रित मनाने खेळत असला तरी तो तितकाच मस्तीखोर आहे. आपण अनेकदा विराट कोहलीच्या फनी मुमेंट एन्जॉय केल्यात. विराटचे हावभाव, दुसऱ्या खेळाडूंची घेतलेली फिरकी, कधीकधी मिमिक्री करणे, या गोष्टी आपण बघत आलोय. आता विराटने चक्क भारताचा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंहची (Arshadeep Singh) नक्कल केली आहे. त्याचा हा विडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा विडिओ पाहून तुम्हीही हसू आवरु शकणार नाही.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडिया मैदानावर सराव करताना दिसली. सर्व खेळाडू पूर्ण लक्ष केंद्रित करून नेटमध्ये घाम गाळताना दिसले. या सरावादरम्यान, विराट कोहली मात्र अलग अंदाजात दिसला. विराट मस्करीच्या मूडमध्ये होता, आणि त्याचा शिकार ठरला तो अर्शदीप सिंह… अर्शदीप सिंह हा भारताचा डावखुरा जलदगती गोलंदाज आहे. विराटने प्रॅक्टिस सेशनमध्ये अर्शदीप सिंहच्या धावण्याच्या स्टाईलची नक्कल केली. महत्वाची बाब म्हणजे यावेळी अर्शदीप स्वतः तिथे उपस्थित होता. विराटचा हा नक्कल करतानाचा विडिओ व्हायरल झाल्याने सगळीकडे हशा पिकला.
https://x.com/Trend_VKohli/status/2009639292189233385?s=20
कधी आहे पहिला सामना
दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना रविवारी दुपारी 1:30 वाजता सुरु होणार आहे. शुभमन गिल हा टीम इंडियाचा कर्णधार असून न्यूझीलंडचं नेतृत्व कर्णधार माइकल ब्रॅसवेलच्या हातात आहे. टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या स्टार स्पोर्टस 1 या चॅनलवर आणि मोबाईल वर बघायचा असेल तर जियो हॉटस्टारवर तुम्ही हा सामना लाईव्ह पाहू शकता. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारताचे दोन अनमोल रत्न फक्त एकदिवसीय क्रिकेटच खेळत असल्याने या सामन्याला प्रेक्षकांची मोठी उपस्थिती बघायला मिळेल.