भारताच्या कॉर्पोरेट जगतात एक महत्त्वाची आणि नवी सुरुवात होत आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी आनंद आणि समाधानाला केंद्रस्थानी ठेवत देशात पहिल्यांदाच ‘वर्कप्लेस हॅपिनेस अवॉर्ड्स’ सुरू करण्यात येत आहेत. Happiest Places to Work तर्फे ‘Happiest Places To Work Award’ जाहीर करण्यात आले असून, या पुरस्कारांचा भव्य उद्घाटन सोहळा जुलै महिन्याच्या अखेरीस मुंबई येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज उद्योजक आणि मानव संसाधन तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.
‘वर्कप्लेस हॅपिनेस’ला मिळणार राष्ट्रीय स्तरावर मान्यता
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ नफा किंवा व्यवसाय वाढ हाच यशाचा मापदंड राहिलेला नाही. कर्मचाऱ्यांचा अनुभव, त्यांचे समाधान आणि कामाच्या ठिकाणचे वातावरण हेही तितकेच महत्त्वाचे ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर, कामाच्या ठिकाणी सकारात्मक आणि आनंददायी वातावरण निर्माण करणाऱ्या संस्थांना ओळख देण्यासाठी हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत.
दिग्गज नेतृत्वाखाली होणार कार्यक्रम
या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान हर्ष गोएन्का भूषवणार आहेत. ते RPG Group चे अध्यक्ष असून, उद्योगजगतामधील एक मान्यवर नाव आहेत. त्यांच्या मते, कामाच्या ठिकाणचा आनंद हा आता संस्थांच्या वाढीचा आणि यशाचा महत्त्वाचा घटक बनला आहे. अशा व्यासपीठांमुळे ही चर्चा मुख्य प्रवाहात येते.”
प्रतिष्ठित ज्युरी पॅनल
या पुरस्कारांसाठी निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक ठेवण्यात आली असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश असलेले ज्युरी पॅनल तयार करण्यात आले आहे:
Achal Khanna, CEO of SHRM, APAC & MENA
Harit Nagpal, MD & CEO of Tata Play
Pavitra Singh, CHRO & VP PepsiCo India & South Asia
Dr. Atul Hegde, Founder & Chairman, YAAP Digital
Dr. Prajjal Saha, Founder & Editor-in-Chief, HR Katha
Nitu Bhushan, Director Human Resources, South Asia Nestlé
Pushp Kumar Nayar, Executive Director HRD of BPCL
Sunita Cherian, Ex Chief Culture Officer & Senior Vice President Corporate Human Resources of Wipro.
या उपक्रमाचे संस्थापक राज नायक यांनी सांगितले की, अनेक संस्था अजूनही कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन अनुभवांकडे दुर्लक्ष करतात. हे पुरस्कार अशा कंपन्यांना ओळख देतील ज्या खऱ्या अर्थाने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या भावना आणि अनुभवाला महत्त्व देतात.”
‘हॅपीएस्ट प्लेसेस टू वर्क अवॉर्ड्सTM’ अशा संस्थांचा सन्मान करतात ज्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या अनुभवाबाबत गंभीर आहेत. ही प्रक्रिया ‘हॅपिनेस डायलॉग’ (Happiness Dialogue), कल्चर ऑडिट आणि ज्युरीद्वारे अंतिम पुनरावलोकनावर आधारित आहे. सर्व आकारांच्या आणि सर्व क्षेत्रांतील संस्था यात सहभागी होऊ शकतात. यासाठी नोंदणी आता http://www.happiestplacestoworkawards.com या संकेतस्थळावर सुरू झाली आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून संस्थांना त्यांचे कर्मचारी कामाबद्दल नेमके काय विचार करतात, याचे स्पष्ट चित्र मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
पूर्णपणे ‘वर्कप्लेस हॅपिनेस’वर लक्ष केंद्रित करणारे हे भारतातील पहिलेच पुरस्कार आहेत. यामध्ये विविध कंपन्यांचे CEOs, CHROs आणि व्यावसायिक नेते सहभागी होतील. विविध क्षेत्रे आणि श्रेणींमध्ये यात सन्मान केला जाईल. तसेच, केवळ कंपनीच्या धोरणांच्या पलीकडे जाऊन वास्तविक संस्कृतीवर चर्चा करण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ ठरेल.