हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Railway Projects । नुकत्याच पार पडलेया केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी महाराष्ट्रासाठी भरभरून आर्थिक तरतुद केली आहे. महाराष्ट्रासाठी तब्बल २३,९२६ कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद रेल्वेमंत्र्यांकडून करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई- पुणे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, मालवाहतूक कनेक्टिव्हिटी, बुलेट ट्रेन आणि रेल्वे स्थानकाचा विकास यांसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे.
हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर– Maharashtra Railway Projects
महाराष्ट्रासाठी एकूण रेल्वे बजेटची तरतूद २३,९२६ कोटी रुपये असेल. दरम्यान, राज्यात १.७० लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत, ज्यात मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद दरम्यानचे नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर, मालवाहतूक कॉरिडॉर आणि इतर प्रकल्पांचा समावेश आहे,” असे अश्विनी वैष्णव म्हणाले. नवीन हाय-स्पीड कॉरिडॉरमुळे प्रवासात क्रांती घडेल. मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होऊन केवळ ४८ मिनिटे होईल आणि दोन्ही शहरे व्यावहारिकदृष्ट्या एकमेकांशी जोडली जातील. लोक आपल्या कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त दोन्ही शहरांमध्ये सहज प्रवास करू शकतील. maharashtra train
पुणे-हैदराबाद कॉरिडॉरही तितकाच महत्त्वाचा आहे. “पुणे आणि हैदराबाद दोन्ही प्रमुख आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि उत्पादन केंद्रे आहेत आणि त्यांना हाय-स्पीड कॉरिडॉर, म्हणजेच बुलेट ट्रेन नेटवर्कने जोडणे प्रवाशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ एक तास पंचावन्न मिनिटे असेल असे अश्विनी वैष्णव यांनी म्हंटल. हा नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर मुंबईहून लोणावळा, पुणे, दौंड मार्गे सुरू होईल आणि पुढील टप्पा सिकंदराबादला जोडला जाईल. Maharashtra Railway Projects
जसे टोकियो ते ओसाका दरम्यान, गर्दीच्या वेळी दर १५-२० मिनिटांनी बुलेट ट्रेन धावते. अशीच वारंवारता भारतातही वापरली जाईल आणि गर्दी नसलेल्या वेळेत अंतर वाढवले जाईल, जेणेकरून ते प्रवाशांसाठी सोयीचे होईल. जपान, तैवान आणि दक्षिण कोरिया सारखे देश समृद्ध आहेत कारण बुलेट ट्रेन मार्ग बांधल्याने अनेक उद्योग आकर्षित होतात. टाउनशिप, आयटी पार्क, फूड पार्क, टेक्सटाईल पार्क तयार होतात आणि आर्थिक घडामोडींना चालना मिळते. भारताला सुद्धा याचा फायदा होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं अश्विनी वैष्णव यांनी म्हंटल.
कोकण रेल्वेचा कायापालट
यानंतर किनारी भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या गरजेवर भर देताना वैष्णव म्हणाले, “कोकण रेल्वेची क्षमता सुधारण्याची गरज आहे, कारण ती महत्त्वाच्या किनारी भागांना कनेक्टिव्हिटी देते. दुहेरी मार्गिका, बोगदे मजबूत करणे, जुन्या ट्रॅक तंत्रज्ञानाचे नूतनीकरण करणे, नाविन्यपूर्ण कवच प्रणाली स्थापित करणे, यासह इतर कामांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) पूर्ण झाला असून तो मंजुरीच्या टप्प्यात आहे.