Maharashtra Trains : मराठवाड्यात धावणार 3 स्पेशल ट्रेन!! पहा संपूर्ण वेळापत्रक आणि थांबे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मराठवाड्यातून उत्तर भारतात ३ विशेष ट्रेन धावण्यात येणार आहेत. सध्या प्रजासत्ताक दिन आणि रविवारी सलग सुट्ट्या असल्याने अनेक प्रवासी आपल्या मूळ गावी जाण्याची शक्यता आहे. साहजिकच रेल्वेची गर्दी वाढणार आहे. या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे विभागाने अतिरिक्त ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे कडून 23 ते 26 जानेवारी दरम्यान चंदीगड-नांदेड, दिल्ली (हजरत निजामुद्दीन)-नांदेड, अमृतसर-चेरलापल्ली मार्गावर या विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत. आज आपण या तिन्ही स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक जाणून घेऊया.

अमृतसर-चेरलापल्ली (04542) ट्रेन

अमृतसर – चेरलापल्ली विशेष रेल्वे २३ व २४ जानेवारी रोजी अमृतसरहून पहाटे ३:३५ वाजता सुटेल. तर दुसऱ्या दिवशी दुपारी २:१५ वाजता छत्रपती संभाजीनगरला पोहोचेल. तिसऱ्या दिवशी पहाटे ३:३० वाजता ती चेरलापल्ली येथे पोहोचेल .

चंदीगढ – हुजूरसाहिब नांदेड विशेष रेल्वे

ही ट्रेन चंदीगढ येथून २३ व २४ जानेवारी रोजी पहाटे ५:४० वाजता सुटेल. हि रेल्वे प्रवासादरम्यान, अंबाला, पानिपत, दिल्ली, आगरा, झांशी, बिना, भोपाल, इटारसी, खांडवा, भुसावळ, मनमाडमार्गे दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरला सकाळी ८:१३ वाजता पोहचेल. यानंतर २ मिनिटातच ती पुढे नांदेडसाठी रवाना होईल. जालना, परभणी, पूर्णा मार्गे दुपारी १:३० वाजता हि ट्रेन नांदेडला पोहोचेल. परतीच्या प्रवासात हीच ट्रेन २५ व २६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता नांदेड स्थानकावरून सुटेल आणि मध्यरात्री १:१५ वाजता . छत्रपती संभाजीनगरला येईल. ५ मिनिटातच ती चंदीगढच्या दिशेने रवाना होईल.

हजरत निजामुद्दीन – हुजूरसाहिब नांदेड विशेष रेल्वे

हि स्पेशल ट्रेन हजरत निजामुद्दीन येथून २३ व २४ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता सुटेल.ती पालवल, आगरा, झांशी, बिना, भोपाल, इटारसी, खांडवा, भुसावळ, जालगाव, मनमाडमार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी १०:२० वाजता छत्रपती संभाजीनगरला पोहचेल. ५ मिनिटातच ती नांदेडसाठी रवाना होईल आणि
दुपारी ४:२० वाजता नांदेडला पोहचेल.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading