हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची महिला क्रिकेटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांचे लग्न ऐनवेळी मोडलं. खरं तर स्मृती आणि पलाश यांचे लग्न अगदी धुमधडाक्यात पार पडणार होते, दोन्ही बाजूनी पाहुणे मंडळीही लग्नाला आली होती. परंतु अक्षदा पडण्याच्या आधीच स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि लग्न रद्द करण्यात आलं. परंतु लग्न रद्द करण्यामागे दुसरच काहीतरी कारण असल्याच्या चर्चा सुरु होत्या. पलाशने स्मृतीला फसवलं असेही बोललं जात होत. आता स्मृती मानधनाच्या एका जवळच्या व्यक्तीने पलाश मुच्छल बाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे.
स्मृतीचा जवळचा मित्र असलेल्या विज्ञान माने याने म्हंटल कि, ते स्वतः स्मृती आणि पलाशच्या लग्नाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी पलाश मुच्छल यांना एका महिलेसोबत बेडवर रंगेहात पकडण्यात आले. या घटनेनंतर वातावरण प्रचंड तणावपूर्ण झाले आणि भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी पलाशला धु धु धुतले. ‘तो प्रसंग अतिशय भयानक होता. संपूर्ण कुटुंबच संतापले होते. मी विचार केला होता की लग्नानंतर ते सांगलीत स्थायिक होतील, पण सगळं उलटच घडलं,’ असे विज्ञान माने यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.
विज्ञान माने यांनी पलाश मुच्छल याच्यावर तब्बल 40 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा सुद्धा दाखल केला आहे. वैभव मान यांनी पोलिसांना सांगितले की, पलाश यांनी चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी गुंतवणुकीवर परतावा तात्काळ मिळेल, असेही आश्वस्त केले होते. या सर्व दाव्यांवर विश्वास ठेवून वैभव यांनी 40 लाख रुपये गुंतवले. मात्र, चित्रपट पूर्ण न झाल्याने आणि काम थांबल्याने गुंतवणूक परत करण्याचे आश्वासनही पूर्ण झाले नाही. चित्रपटाचे काम पूर्णपणे बंद झाल्यानंतरही पलाश यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. अनेक महिन्यांपर्यंत संपर्क साधूनही गुंतवणुकीची रक्कम मिळाली नाही.
दरम्यान, स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे होणार होते. मात्र स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने दाखल करावे लागले. यानंतर पलाशही तणाव आणि थकव्यामुळे आजारी पडला, त्यामुळे काही अनिश्चित काळासाठी त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले. पण काही दिवसांनंतर स्मृती मानधनाने अधिकृतपणे लग्न रद्द करण्याची घोषणा केली होती.