अहिल्यानगर : दिव्यांग आणि मूकबधिर बांधवांना आपल्या जीवनाचा जोडीदार शोधण्यासाठी हक्काचे आणि विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सर्वधर्मीय दिव्यांग व मूकबधिर बांधवांचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. येत्या ३० ऑगस्ट २०२६ रोजी, हा मेळावा प्रहार करिअर अकॅडमी, अहिल्यानगर-संभाजीनगर हायवे, इमामपूर, जि. अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
जीवनसाथींचा हक्क सर्वांना’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दिव्यांग व मूकबधिर बांधवांना विवाहासाठी योग्य स्थळांची माहिती मिळण्याची तसेच एकमेकांशी परिचय करून घेण्याची संधी मिळणार आहे.
महिलांसाठी विशेष सुविधा
मेळाव्यात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी आयोजकांकडून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये मोफत प्रवास, मोफत निवास आणि मोफत भोजन यांचा समावेश आहे. तसेच महिलांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.मेळाव्यात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी आयोजकांकडून मोफत प्रवास, मोफत निवास आणि मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मोफत प्रवासासाठी महिलांना एसटी बसने येणं गरजेचं आहे. आयोजकांना प्रवासाचे तिकीट दाखवल्यानंतर त्या तिकिटाचे पैसे सदर व्यक्तींना देण्यात येतील. तसेच वधु -वरानी पालक म्हणून शक्यतो आपल्या आईला घेऊन यावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्यही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुरुषांसाठीही मोफत निवास आणि भोजन
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या पुरुषांसाठी मोफत निवास आणि मोफत भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांतून इच्छुक वधू-वरांना या मेळाव्यात सहभागी होणे शक्य होणार आहे.
मूकबधिर बांधवांसाठी सांकेतिक भाषेची सुविधा
मूकबधिर बांधवांचा या मेळाव्यात सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सांकेतिक भाषेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय सहभागी मूकबधिर बांधवांसाठी विशेष मार्गदर्शनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
WhatsApp वरून करता येणार नोंदणी
या मेळाव्यासाठी नोंदणी प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. इच्छुकांनी आपल्या मोबाईलवरून ९९२१९५९२८५ या WhatsApp क्रमांकावर HI असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर आयोजकांकडून संबंधित व्यक्तीशी फोनद्वारे संपर्क साधून पुढील नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सहभागींची माहिती सुरक्षित पद्धतीने नोंदवली जाणार आहे.
माहिती जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन
“तुमच्या एका शेअरमुळे दिव्यांगांच्या आयुष्यात नवं नातं सुरू होऊ शकतं!” या संदेशातून या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त दिव्यांग आणि मूकबधिर बांधवांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जीवनसाथीच्या शोधात असलेल्या दिव्यांग आणि मूकबधिर बांधवांसाठी हा मेळावा एक महत्त्वपूर्ण संधी ठरू शकतो. त्यामुळे इच्छुकांनी वेळेत नोंदणी करून ३० ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
मेळाव्याची माहिती :
📅 दिनांक : ३० ऑगस्ट २०२६, रविवार
📍 स्थळ : प्रहार करिअर अकॅडमी, अहिल्यानगर-संभाजीनगर हायवे, इमामपूर, जि. अहिल्यानगर
📱 नोंदणी : WhatsApp वर ‘HI’ पाठवा – ९९२१९५९२८५
🤝 आयोजक : प्रहार करिअर अकॅडमी