VerSe Innovation तर्फे पी. आर. रमेश यांची स्वतंत्र संचालक आणि ऑडिट कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

भारतामधील आघाडीची AI-आधारित स्थानिक भाषा तंत्रज्ञान कंपनी VerSe Innovation ने आपल्या संचालक मंडळात मोठी भर घातली आहे. कंपनीने अनुभवी व्यावसायिक पी. आर. रमेश यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय ते ऑडिट कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळणार आहेत. कंपनी आता वाढीच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत असून, ही नियुक्ती तिच्या व्यवस्थापन आणि पारदर्शकतेला अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

पी. आर. रमेश हे सनदी लेखापाल असून त्यांना चार दशकांहून अधिक अनुभव आहे. आर्थिक व्यवस्थापन, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, जोखीम नियंत्रण आणि बोर्ड स्तरावरील निर्णय प्रक्रियेत त्यांचा मोठा अभ्यास आहे. ते पूर्वी Deloitte India चे अध्यक्ष होते आणि जागतिक स्तरावरही त्यांनी नेतृत्व केले आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मोठ्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना सल्ला दिला आहे. आर्थिक अहवाल, नियमांचे पालन आणि व्यवस्थापनातील शिस्त या बाबतीत त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.

सध्या ते एअर इंडिया, सिप्ला, नेस्ले इंडिया, लार्सन अँड टुब्रो, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, आयटीसी हॉटेल्स, सायंँट, तेजस नेटवर्क्स आणि हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) यांसारख्या अनेक नामांकित सूचीबद्ध आणि असूचीबद्ध कंपन्यांच्या बोर्डावर कार्यरत आहेत. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना “सर्वोत्कृष्ट स्वतंत्र संचालक” हा पुरस्कारही मिळाला आहे.

रमेश यांनी केवळ कंपन्यांमध्येच नव्हे, तर देशाच्या आर्थिक आणि नियामक धोरणांमध्येही योगदान दिले आहे. त्यांनी SEBI, RBI आणि IRDA संबंधित समित्यांमध्ये काम करून धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत भाग घेतला आहे. VerSe Innovation चे सह-संस्थापक उमंग बेदी यांनी सांगितले की, मजबूत व्यवस्थापन आणि आर्थिक शिस्त ही दीर्घकालीन यशासाठी अत्यावश्यक असते. रमेश यांचा अनुभव कंपनीला पुढील टप्प्यात अधिक सक्षम बनवेल आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवेल.

या नियुक्तीबद्दल बोलताना पी. आर. रमेश म्हणाले की, VerSe Innovation ने भारताच्या डिजिटल क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. आता या वाढीसोबतच मजबूत नियंत्रण, पारदर्शकता आणि जबाबदारी टिकवणे आवश्यक आहे. ते कंपनीसोबत काम करून दीर्घकालीन आणि शाश्वत वाढ साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहतील.नव्या भूमिकेत ते कंपनीच्या आर्थिक अहवालांची अचूकता, अंतर्गत नियंत्रण प्रणाली, जोखीम व्यवस्थापन आणि नियमांचे पालन यावर लक्ष ठेवतील. त्यांच्या अनुभवामुळे कंपनीची एकूण कार्यपद्धती अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

VerSe Innovation ची स्थापना डिजिटल दरी कमी करण्याच्या उद्देशाने झाली आहे. कंपनी AI, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगच्या मदतीने वापरकर्त्यांना त्यांच्या भाषेत आणि आवडीनुसार कंटेंट उपलब्ध करून देते.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading