हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bikini Beaches in Goa । गोव्यात हिवाळी पर्यटन हंगाम जोरात सुरू असून देश-विदेशातील पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. विशेषतः उत्तर गोव्यातील काही समुद्रकिनारे ‘बिकनी बीचेस’ म्हणून ओळखले जात असून, येथे खुले आणि पर्यटनपूरक वातावरण पाहायला मिळत आहे. गोव्यावर अनेक वर्ष पोर्तुगीजानी राज्य केल्यामुळे येथे पाश्चात्य संस्कृतीचा चांगलाच पगडा आहे. भारतातील इतर राज्यात कपडे परिधान करण्याबाबत काही नियम असले तरी गोव्यात मात्र असे कोणतेही निर्बध नाहीत, त्यामुळे गोव्यात तर समुद्रकिनारी बिकनी परिधान करून असंख्य महिला फोटोशूट करताना दिसतात. गोव्यातील बागा, कॅलंगुट, अंजुना, वागाटोर, कॅंडोलिम आणि मोरजिम हे समुद्रकिनारे पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहेत. या ठिकाणी परदेशी पर्यटकांची संख्या अधिक असल्याने बिकनी वेअर, सनबाथिंग आणि बीच अॅक्टिव्हिटीज सामान्य बाब मानली जाते.
1) बागा बीच –
बागा बीच हा गोव्यातील सर्वाधिक गजबजलेला समुद्रकिनारा आहे.पणजीपासून हा बीच 16 किलोमीटर अंतरावर आहे. वॉटर स्पोर्ट्स, बीच पार्टीज आणि नाईटलाइफसाठी हा बीच ओळखला जातो. तरुण वर्ग आणि सोशल मीडिया टुरिस्टचा येथे मोठा ओढा दिसून येतो. येथे बिकनी किंवा स्विमसूट घालणे सामान्य बाब मानली जाते. याठिकाणी पर्यटक पॅरासेलिंग, जेट-स्कीइंग, केळी बोट राइड आणि बरेच काही यासारख्या क्रियाकलापांचा आनंद घेऊ शकतात. बीच च्या शेजारी अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि अतिथीगृहे आहेत, जे विविध बजेटसाठी राहण्याचे पर्याय देतात.
2) अंजुना आणि वागाटोर –
अंजुना बीच हा हिप्पी संस्कृती, म्युझिक पार्टीज आणि फ्ली मार्केटसाठी प्रसिद्ध आहे. तर वागाटोर बीच निसर्गरम्य कडे, सनसेट पॉइंट आणि तुलनेने कमी गर्दीसाठी ओळखला जातो. या दोन्ही ठिकाणी युरोपियन पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. अंजुना बीच येथील परिसर हा अत्यंत नयनरम्य आहे. येथे झाडंझुडुपं, स्वच्छ हवा, निळसर आकाश, स्वच्छता, कमी प्रदूषण अनुभवायला मिळते. त्यातून येथे अनेक रिसोर्ट्स आणि रेस्टोरंट्सही आहेत. अंजुनामध्ये अनेक नाईट क्लब आणि बीच शॅक आहेत, जे पार्टीसाठी प्रसिद्ध आहेत.
3) कॅंडोलिम –
हा समुद्रकिनारा पणजीच्यापुढे अग्वाद किल्ल्यापासून सुमारे 15 किमी अंतरावर आहे. कॅंडोलिम बीच तुलनेने शांत आणि स्वच्छ असून फॅमिली आणि परदेशी पर्यटकांचा समतोल येथे पाहायला मिळतो. तर मोरजिम बीच ‘लिटल रशिया’ म्हणून ओळखला जातो. कमी गर्दी, प्रायव्हसी आणि निवांत वातावरण हे या बीचचे वैशिष्ट्य आहे. कॅंडोलिम समुद्रकिनारा हा नाइटलाइफ आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी ओळखला जातो. याठिकाणी तुम्ही पॅरासेलिंग, जेट स्कीइंग आणि बनाना बोट राइड यांसारख्या विविध जलक्रीडांचा आनंद घेऊ शकता.
प्रशासनाकडून पर्यटकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. बिकनी किंवा अल्पवस्त्र परिधान करणे फक्त समुद्रकिनाऱ्यांपुरतेच मर्यादित ठेवावे, सार्वजनिक रस्ते, बाजारपेठा आणि धार्मिक स्थळांमध्ये सभ्य पोशाख परिधान करावा, तसेच स्थानिक संस्कृतीचा आदर राखावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हिवाळी पर्यटनामुळे गोव्यातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळत असली, तरी पर्यटनाचा आनंद घेताना शिस्त, सुरक्षितता आणि सांस्कृतिक समतोल राखणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून व्यक्त केले जात आहे.