Breaking News : लष्कराची गाडी 200 फूट दरीत कोसळली; 10 जवान शाहिद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Breaking News । जम्मू काश्मीर मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. जम्मू आणि काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात एक लष्करी ट्रक रस्त्याने घसरून दरीत पडला. या अपघातात १० जवान शहीद झाले, तर अनेक जण जखमी झाले आहेत. भारतीय सैन्य दलाचा हा ट्रक डोडाच्या भद्रवाह चंबा रोडवरून जात होता, त्याच दरम्यान ही मोठी दुर्घटना घडली आहे, भादरवाह-चंबा सीमेजवळील खानी टॉप परिसरात हा अपघात झाला.

याबाबत लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, लष्कराचे बुलेटप्रूफ वाहन उंच चौकीकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन २०० फूट खोल दरीत कोसळले. गाडीत १७ सैनिक होते. त्यापैकी सात जण जखमी झाले आणि दहा जण शहीद झाले. जखमींपैकी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांना विमानाने उधमपूर लष्करी रुग्णालयात नेण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या एका ट्विटच्या माध्यमातून शहीद सैनिकांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी म्हंटल कि, देशासाठी १० सैनिकांच्या मृत्युमुळे त्यांना दुःख झाले आहे.

यापूर्वी , १८ जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथे दहशतवाद्यांचा शोध घेत असताना सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आठ सैनिक जखमी झाले. यापैकी एका सैनिकाचा १९ जानेवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. शहीद जवानाचे नाव हवालदार गजेंद्र सिंह असे आहे.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील सुरक्षा परिस्थिती अलिकडेच संवेदनशील राहिली आहे. अलिकडे दहशतवादी कारवाया आणि सुरक्षा कारवाया वाढल्या आहेत. दोडा जिल्ह्यात, विशेषतः डोंगराळ आणि जंगली भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल चिंता वाढत आहे. गुप्तचर अहवालांवरून असे दिसून येते की डोडा आणि शेजारच्या किश्तवार जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील सुरक्षा परिस्थिती अलिकडेच संवेदनशील राहिली आहे. अलिकडे दहशतवादी कारवाया आणि सुरक्षा कारवाया वाढल्या आहेत. दोडा जिल्ह्यात, विशेषतः डोंगराळ आणि जंगली भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल चिंता वाढत आहे. गुप्तचर अहवालांवरून असे दिसून येते की डोडा आणि शेजारच्या किश्तवार जिल्ह्यात ३०-३५ पाकिस्तानी वंशाचे दहशतवादी सक्रिय असू शकतात, जे जंगलात लपले आहेत.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading