हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Farooq Abdullah Attacked । राष्ट्रीय स्तरावरून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर येत आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ नेते फारूक अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला आहे. बुधवारी रात्री ग्रेटर कैलाश परिसरात एका लग्न समारंभात हि धक्कादायक घटना घडली. यावेळी फारूक अब्दुल्ला यांच्या सुरक्षा रक्षकांनी हा हल्ला उधळून लावला आणि फारुख अब्दुल्ला थोडक्यात बचावले. याच दरम्यान, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांना गोळीबाराच्या झटक्याने किरकोळ दुखापत झाली.
फारूक अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार करण्यात (Farooq Abdullah Attacked) आल्याचा CCTV व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. त्यात स्पष्ट दिसत आहे कि फारुख अब्दुल्ला, सुरिंदर चौधरी आणि मुख्यमंत्र्यांचे राजकीय सल्लागार नासिर अस्लम वाणी हे एका ज्येष्ठ वकिलाच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी रॉयल पार्क बँक्वेट हॉलमध्ये पोहोचले तेव्हा हल्लेखोर हा पाठीमागून आला आणि त्याने बंदुकीच्या जोरावर फारूक अब्दुल्ला याना टार्गेट केलं. त्याचवेळी अब्दुल्ला यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला दूर ढकललं आणि ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. याच झटापटीत गोळी सुटली. उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांना यावेळी किरकोळ दुखापत झाली.
बड़ी खबर-
— Narendra Nath Mishra (@iamnarendranath) March 11, 2026
जम्मू में पूर्व मुखमंत्री फारूक अब्दुल्लाह पर एक शादी समारोह में फायरिंग । गोली चली। बाल बाल बचे। डिप्टी सीएम सुरेंद्र चौधरी भी साथ थे।
हमलावर कमल सिंह जामवाल गिरफ्तार! pic.twitter.com/1qkBWGwjho
कमल सिंग जामवाल असं सदर हल्लेखोराचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. चौकशीदरम्यान कमल सिंग जामवालने खळबळजनक खुलासा करत गेल्या २० वर्षांपासून त्यांना मारण्याचा कट रचत होतो असं म्हंटल आहे. मात्र त्याने अद्याप या द्वेषामागील कारण किंवा हेतू स्पष्ट केलेला नाही. Farooq Abdullah Attacked
इंटरनेटवर पोस्ट केलेल्या निवेदनात, जम्मू दक्षिणचे पोलिस अधीक्षक अजय शर्मा म्हणाले की फारुख अब्दुल्ला सुरक्षित आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस त्याचे हेतू आणि पार्श्वभूमी तपासत आहेत. तो जम्मू शहरातील जुनी मंडी भागातील रहिवासी असून त्याची चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या वेळी हल्लेखोर मद्यधुंद अवस्थेत होता. मात्र या संपूर्ण प्रकरणात दहशतवादी कट रचण्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे.