FASTag Annual Pass Price Hike : टोल प्रवास महागणार; FASTag वार्षिक पासमध्ये 2.5% वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FASTag Annual Pass Price Hike : राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणं आणखी महागणार आहे. खाजगी वाहनांसाठी उपलब्ध असलेल्या FASTag वार्षिक पासच्या किमतीत वाढ करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया वार्षिक पासमध्ये नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया २. ५ टक्के वाढ करणार आहे. सध्या FASTag वार्षिक पास हा ३००० रुपयांत मिळतो. मात्र दरवाढीनंतरच वाहन चालकांना याचा पाससाठी 3,075 रुपये मोजावे लागतील.

नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियानं सर्व टोल प्लाझा आणि संबंधित अधिकाऱ्यांना १ एप्रिल २०२६ पासून नवीन दर लागू करण्याचे आणि याची माहिती प्रवासी व इतर भागधारकांना देण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन नियमानुसार, 3075 रुपयांचा हा पास एक वर्ष किंवा 200 वेळा टोल क्रॉसिंगसाठी (Crossings) वैध असेल. यापैकी जे आधी पूर्ण होईल, त्यानुसार पासची वैधता संपेल. नियमितपणे महामार्ग वापरणाऱ्या वाहनचालकांसाठी हा पास अत्यंत उपयुक्त ठरतो.

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या मते, जेव्हा हा वार्षिक पास (FASTag Annual Pass Price Hike) सुरू करण्यात आला तेव्हा नियमांमध्ये असे नमूद केले होते की त्याच्या किमतींचा दरवर्षी आढावा घेतला जाईल. या वर्षीची किंमत वाढ या प्रक्रियेवर आधारित आहे. सरकारने १५ ऑगस्ट रोजी हा वार्षिक पास सुरू केला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत ५२ लाखांहून अधिक कार मालक या सुविधेचा लाभ घेत आहेत. त्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे तो वर्षातून अनेक वेळा रिचार्ज करता येतो

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, १ एप्रिलपासून नवीन दर लागू होण्यापूर्वी वाहनचालकांना सध्याच्या किमतीत पास खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत रिचार्ज करणाऱ्या वापरकर्त्यांना हा पास 3,000 रुपयांत म्हणजे सध्याच्या दरातच मिळेल. FASTag वार्षिक पासच्या किमतीतील ही वाढ देशभरातील महामार्ग टोल दरांमध्ये दरवर्षी केली जाणारी सुधारणा लक्षात घेऊन करण्यात आली आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading