हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Holi 8 Days Holidays । अनेकांना नोकरीनिमित्त वेगवेगळे सण साजरे करता येत नाही. फक्त सणच नव्हे तर एखाद्याचा लग्न समारंभ, इतर काही कार्यक्रमाला जाता येत नाही. अनेकदा तर सणाला जास्तीच्या सुट्ट्या न मिळाल्याने बॉसच्या नावाने आपण खडे फोडतो. धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि कामाच्या ताणामुळे इतरांना वेळ देणं जरा कसरतीचेच जाते. अशावेळी तर होळीच्या दिवशी तुम्हाला कंपनी आठ दिवसांची सुट्टी देत असल्याची माहिती देणारा ईमेल आला तर कसे वाटेल? तुम्हीही अगदी आनंदाने उड्या माराल ना?? सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये दावा केला जात आहे की एका कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना होळीसाठी आठ दिवसांची सुट्टी दिली आहे. हे खरे आहे की ते फक्त लोकांची दिशाभूल करत आहे हे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
खरं तर, लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की निलंक टेकने त्यांच्या कर्मचाऱ्यांना होळीसाठी आठ दिवसांची सुट्टी दिली आहे. निलंक-तिवारी प्रोफाइलच्या लिंक्डइन अकाउंटवर यासंबंधी एक पोस्ट करण्यात आली आहे. प्रोफाइलनुसार, निलंक तिवारी हे निलंक टेकचे संस्थापक आणि संचालक आहेत. पोस्टमध्ये म्हटले आहे की निलंक टेक प्रा. लि. आम्ही होळीसाठी आठ दिवसांची सुट्टी जाहीर केल्यापासून, माझे लिंक्डइन आणि इंस्टाग्राम मेसेजने भरले आहेत. हे खरे आहे का? कॉर्पोरेट सेटिंगमध्ये आठ दिवसांची सुट्टी? एवढी मोठी सुट्टी देता येते का?
संचालकांनी लिंक्डइनवर काय लिहिले? Holi 8 Days Holidays
निलंक तिवारी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, खरे सांगायचे तर, लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत हे समजण्यासारखे आहे, कारण बहुतेक कार्यालयांमध्ये कोणताही सणवार असला तरी दोन दिवसांची सुट्टी मागणे देखील कठीण असते. सुट्ट्या मर्यादित असतात आणि सण फक्त कॅलेंडरच्या तारखा बनतात. माझ्यासाठी, होळी आणि दिवाळी हे सण फक्त सुट्ट्यासाठी नाहीत तर हे सण म्हणजे माझ्यासाठी माझ्यासाठी भावना आहेत, घरी जाण्याची भावना आहे, कुटुंबासोबत राहण्याचा हा वेळ आहे. Holi 8 Days Holidays
आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या कुटुंबापासून दूर राहतात. आपण वर्षभर हे सण घरी येण्याची आणि ते शांततेत साजरे करण्याची वाट पाहतो, पण प्रत्यक्षात काय होते? तुम्ही घरी पोहोचता आणि तुमच्या मनात एकच विचार येतो की, “मला उद्या परत जायचे आहे.” या एका गोष्टीमुळे उत्सवाचा अर्धा आनंद हिरावून टाकला जातो. मला माझ्या टीमसाठी ही भावना दूर करायची होती. माझी टीम कोणत्याही ताण तणावा शिवाय घरी जावी, त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत मनापासून उत्सव साजरा करावा, हसत खेळत राहावे, आराम करावा आणि प्रत्येक क्षणी उपस्थित राहावे, दुसऱ्या दिवशी परत येण्याची घाई करू नये अशी माझी इच्छा होती असं निलंक तिवारी यांनी यांनी म्हंटल. आता खरंच त्यांनी कंपनीमधील कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे का ते वेळ आल्यावर समजेलच.