हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways Full Train Booking। मोठ्या प्रमाणावर पाहुण्यांसह लग्नसमारंभ, धार्मिक यात्रा, कॉर्पोरेट टूर किंवा कौटुंबिक सहल आयोजित करताना प्रवासाची सोय हा सर्वात मोठा प्रश्न असतो. आपण एखाद्या लांबच्या लग्नाला जायचं असेल तर भावकीतील लोकांसाठी ट्रॅव्हल्स बुक करतो, मित्रांसोबत फिरायला जायचं असेल आणि प्रवाशांची संख्या जास्त असेल तर अशावेळीही ट्रॅव्हल्स बुक केली जाते. परंतु तुम्हाला माहितेय का? तुम्ही लग्न समारंभ किंवा सहलीसाठी संपूर्ण ट्रेन बुक करू शकता. होय, यासाठी तुम्हला भारतीय रेल्वेची हि खास सुविधा माहित असणे आवश्यक आहे. चला तर आपण याबाबत थोडक्यात समजून घेऊया.
लग्न समारंभ किंवा सहलीसाठी संपूर्ण ट्रेन बुक करण्यासाठीभारतीय रेल्वेकडून उपलब्ध असलेली विशेष “ग्रुप ट्रॅव्हल ट्रेन” सुविधा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.ही सेवा Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) च्या Full Tariff Rate (FTR) प्रणाली अंतर्गत उपलब्ध आहे. FTR म्हणजे Full Tariff Rate प्रणाली. या सिस्टीमच्या माध्यामातून तुम्ही एक स्वतंत्र कोच (डबा) बुक करू शकता किंवा संपूर्ण ट्रेनच आरक्षित करू शकता. लग्न, खाजगी कार्यक्रम, शैक्षणिक सहल, धार्मिक यात्रा किंवा मोठ्या गटासाठी हा पर्याय उपलब्ध आहे. Indian Railways Full Train Booking
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट: ftr.irctc.co.in ला भेट द्या. बुकिंग करताना आगाऊ ठेव रक्कम भरावी लागते. एका कोचसाठी: ₹५०,००० रुपये तर संपूर्ण १८ कोचच्या ट्रेनसाठी: ९,००,००० रुपये. ही रक्कम परताव्यायोग्य ठेव (Refundable Deposit) असते, मात्र अंतिम भाडे वेगळे आकारले जाते. याठिकाणी हि गोष्ट लक्षात ठेवा कि, भाडे सामान्य प्रवासी भाड्यापेक्षा सुमारे ३०% जास्त असते. याशिवाय अतिरिक्त सेवा शुल्क लागू होते
बुकिंग कधी करावे?
किमान ३० दिवस आधी अर्ज करणे आवश्यक आहे. तुम्ही ६ महिने आधीपर्यंत आगाऊ बुकिंग करू शकता. म्हणजेच लग्नाची तारीख निश्चित होताच ट्रेन आरक्षणाची प्रक्रिया सुरू करणे योग्य ठरेल. ही सुविधा फक्त मेल आणि एक्सप्रेस ट्रेनसाठी उपलब्ध आहे. वंदे भारतसारख्या प्रीमियम ट्रेन या योजनेत समाविष्ट नाहीत. मोठ्या प्रमाणातील लग्नसोहळे, धार्मिक यात्रा (तीर्थयात्रा गट), शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट टूर, मोठ्या कौटुंबिक सहली, यांच्यासाठी अशा प्रकारे थेट रेल्वेचं बुकिंग करणे उत्तम पर्याय आहे.