LPG Gas Cylinder : आता फक्त 10KG गॅस सिलेंडर मिळणार? सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन LPG Gas Cylinder । इराण आणि इस्राईल यांच्यात मध्यपूर्वेतील युद्धाचा सर्वात मोठा फटका भारताला बसला आहे. भारत आखाती देशातून मोठ्या प्रमाणात गॅसची आयात करतो, मात्र होर्मूझ सामुद्रधुनी बंद असल्याने देशातील गॅस पुरवठ्यात मोठा व्यत्यय आला. गॅस टंचाईचे मोठे संकट देशावर अजूनही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार एका मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे. १४.२-किलोग्रामच्या घरगुती एलपीजी सिलेंडरमध्ये फक्त १० किलोग्राम गॅस देण्याचा सरकारचा प्लॅन आहे. जेणेकरून मर्यादित साठा शक्य तितक्या जास्त ग्राहकांपर्यंत वितरित करता येईल. तसेच यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळेल.

इकॉनॉमिक टाइम्स’मधील एका अहवालानुसार, कंपन्यांचा अंदाज आहे की १४.२-किलोग्रामचा सिलेंडर एका सामान्य कुटुंबाला ३५-४० दिवस पुरतो, तर १०-किलोग्रामचा सिलेंडर (LPG Gas Cylinder) त्यांची गरज सुमारे एक महिना भागवू शकतो. यामुळे उपलब्ध गॅस अधिक घरांपर्यंत वितरित करणे शक्य होईल. जर ही योजना लागू झाली, तर सिलेंडरवर नवीन स्टिकर्स लावले जातील, ज्यामध्ये गॅस सिलेंडर कमी भरला आहे हे ग्राहकांना दाखवण्यात येईल. तसेच गॅस कमी भरल्याने त्याच्या किमतीत सुद्धा ग्राहकांना सवलत दिली जाईल. १४.२-किलोच्या गॅस सिलेंडर पेक्षा हा १० किलोचा गॅस स्वस्त असेल. परंतु यासाठी बॉटलिंग प्लांटमध्ये तांत्रिक बदल आणि नियामक मंजुरीची आवश्यकता असेल.

पेट्रोलियम मंत्रालयातील सहसचिव सुजाता शर्मा यांनी अलीकडेच एलपीजी पुरवठ्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि गॅसचे संवर्धन आवश्यक असल्याचे सांगितले. व्यावसायिक क्षेत्राला होणारा पुरवठा, जो पूर्वी थांबवण्यात आला होता, तो आता युद्धपूर्व पातळीच्या ४०% पर्यंत पूर्ववत करण्यात आला आहे. देशातील एकूण एलपीजीचा वापर दररोज अंदाजे ९३,५०० टन आहे, त्यापैकी ८०,४०० टन, म्हणजेच ८६%, घरगुती वापरासाठी लागतो. LPG Gas Cylinder

भारत आपल्या एलपीजीच्या गरजेपैकी अंदाजे ६०% आयात करतो, त्यातही ९० टक्के एलपीजी हा आखाती देशातून येतो. मात्र इराण आणि इस्राईल युद्धामुळे आखाती देशातून होणारी वाहतूक बंद आहे. गेल्या आठवड्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून केवळ दोन जहाजे भारतात आली, ज्यात अंदाजे ९२,७०० टन एलपीजी होता. परंतु हा साठा एकच दिवस पुरेल इतका होता.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading