Sukhoi Su30 Crashed : देशासाठी एक दुःखद बातमी आहे. भारतीय हवाई दलाचे (IAF) सुखोई Su-30MKI लढाऊ विमान हे कोसळलं आहे. आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात हि दुर्घटना घडली असून या अपघातात विमानातील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक वैमानिक हे आपल्या महाराष्ट्रातील होते. त्यामुळे महाराष्ट्रावरही या विमान अपघातामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या विमान अपघाताची माहिती देताना भारतीय हवाई दलाने म्हटले आहे की, “Su-30MKI लढाऊ विमान प्रशिक्षण मोहिमेवर होते आणि जोरहाटपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या आसामच्या कार्बी आंगलोंग भागात ते कोसळले (Sukhoi Su30 Crashed) . सुखोयी “Su-30 अपघातात मृत पावलेल्या स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुर्गाकर यांच्या कुटुंबियांना भारतीय हवाई दल तीव्र संवेदना व्यक्त करते. “या दुःखाच्या वेळी सर्व भारतीय हवाई दलाचे कर्मचारी त्यांच्या तीव्र संवेदना व्यक्त करतात आणि शोकाकुल कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
IAF acknowledges the loss of Sqn Ldr Anuj and Flt Lt Purvesh Duragkar, who sustained fatal injuries in the Su-30 crash. All personnel of the IAF express sincere condolences and stand firmly with the bereaved family in this time of grief: Indian Air Force pic.twitter.com/PODgDwPprS
— ANI (@ANI) March 6, 2026
भारतीय हवाई दलाने गुरुवारी, 5 मार्च रोजी रात्री 9:34 वाजता लढाऊ विमान बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. या लढाऊ विमानाने आसाममधील जोरहाट येथून उड्डाण केले आणि संध्याकाळी ७:४२ वाजता शेवटचा संपर्क साधला गेला. त्यानंतर मात्र त्याचा संपर्क तुटला होता. हे लढाऊ विमान बेपत्ता होताच भारतीय हवाई दलाने शोध मोहीम सुरू केली. काल रात्री उशिरा हवाई दलाने सुखोई लढाऊ विमान सापडल्याचे वृत्त दिले, परंतु विमान आधीच क्रॅश झाले होते. Su-30MKI हे रशियन विमान उत्पादक कंपनी सुखोईने बनवलेले दोन आसनी लढाऊ विमान आहे.
दरम्यान, सुखोई विमान कोसळण्याची (Sukhoi Su30 Crashed) ही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही ऑगस्ट २०१९ मध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले होते. आसाममधील तेजपूरजवळ त्यावेळेची सुखोई-३० एमकेआय विमान नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान कोसळले. दोन्ही वैमानिकांना त्यावेळी विमानातून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आल होते. त्याच्याही आधी मे २०१५ मध्ये, तेजपूर हवाई दल तळापासून सुमारे ३६ किमी दक्षिणेस, आणखी एक सुखोई-३० एमकेआय विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले होते. आताही सुखोई विमानाचा अपघात झाल्याने या विमानावर काही तांत्रिक प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे.