Ajit Pawar Death In Plane Accident : अजित पवारांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झालं आहे. आज सकाळी बारामतीत लँडिंग दरम्यान हा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाचा ताबा सुटल्याने विमानाला भीषण अपघात झाला आणि अजित पवारांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. संपूर्ण देशभरातून अजित पवारांबाबत हळहळ व्यक्त केली जातेय. अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला? असा प्रश्न आता चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आज आपला मोठा भाऊ गेल्याची भावना आहे. मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी दुर्देवी घटना महाराष्ट्रात आज घडली. खरंतर कोणाच्या स्वप्नातही हे असं वाटलं नसेल, अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. अजितदादा गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचे नेतृत्व करत होते, मी त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात काम केलं आहे. ते पहाटे लवकर काम सुरु करायचे. सकाळी 6 वाजताही अधिकाऱ्यांना भेटीची वेळ त्यांनी दिली आहे. वेळेचं महत्व आणि भान ठेवणारा नेता हरपला आहे.

अतिशय परखड स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे, प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक गोष्टीचा अभ्यास करून बोलण्याची सवय होती, परखड स्पष्टपणा आणि निर्भीडपणे, रोखठोकपणे बोलणारे असले तरीसुद्धा चूक त्याला चूक आणि बरोबर त्याला बरोबर असे म्हणणारे ते होते, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. या विमान अपघाताची चौकशी नक्कीच होईल, नक्कीच चौकशी झाली पाहिजे, कारण यापुढे अशा प्रकारच्या अपघात होता कामा नये यासाठी हि चौकशी गरजेची आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

नेमका अपघात कसा झाला?

प्रत्ययक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान खाली येत होतं तेंव्हा हे क्रॅश होणार हे समजत होतं. आधी वाटलं कि धावपट्टीवर विमान उतरत आहे. पण विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. आग एवढी मोठी होती की कोणालाच वाचवणं शक्य नव्हतं. विमान चालकानेही विमान ट्रॅकवर उतरवण्याचा प्रयत्न केला असणार पण धावपट्टीवर येण्याच्या 100 फूट आधी विमान क्रश झालं आणि अजित पवारांसह विमानातील सर्वच्या सर्व ६ जणांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेनं महाराष्ट्र हळहळला आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा काळा दिवस ठरला आहे.

विमानात कोण कोण होते? (Ajit Pawar Dead Baramati Plane Crash)

अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक

Leave a Comment

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading