Ajit Pawar Death In Plane Accident : विमान अपघातात अजित पवार यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झालं आहे. आज सकाळी बारामतीत लँडिंग दरम्यान हा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील हि सर्वात मोठी दुःखद घटना म्हणावी लागेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी हानी हा घटनेमुळे झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साधारण बुधवारी सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास बारामधीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या सभांसाठी अजित पवार बारामतीकडे येत होते. मुंबईहून ते बारामतीच्या दिशेनं रवाना झाले असतानाचअजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाचा ताबा सुटल्याने विमानाला भीषण अपघात झाला. साधारण 500 फूट उंच आभाळात असतानाच हे विमान दरीसदृश्य भागामध्ये कोसळलं.

विमानात कोण कोण होते? (Ajit Pawar Dead Baramati Plane Crash)

  1. अजित पवार
  2. विदीप जाधव
  3. पिंकी माळी
  4. कॅप्टन सुमित कपूर
  5. कॅप्टन शांभवी पाठक

 दरम्यान या अपघाताचं वृत्त समजताच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सर्व राजकीय दौरे रद्द केले असून सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार दिल्लीहून बारामतीच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती आहे. 

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading